RO RO Konkan Railway Service Dainik Gomantak
गोवा

RO RO Service: कोकण रेल्वेच्या रो-रो कारसेवेला थंडा प्रतिसाद! अधिकाऱ्यांचे बुकिंगकडे लक्ष

RO RO Konkan Railway Service: कोकण रेल्वेने २१ जुलैपासून रोल ऑन-रोल ऑफ (रो-रो) वाहन सेवेसाठी आरक्षण सुरू केले होते. मात्र त्यासाठी केवळ ५० जणांनी चौकशी केली तर एकाने आरक्षण निश्चित केले.

Sameer Panditrao

सासष्टी: कोकण रेल्वेने २१ जुलैपासून रोल ऑन-रोल ऑफ (रो-रो) वाहन सेवेसाठी आरक्षण सुरू केले होते. मात्र त्यासाठी केवळ ५० जणांनी चौकशी केली तर एकाने आरक्षण निश्चित केले. ही सेवा महाराष्ट्रातील कोलाड ते गोव्यातील वेर्णा स्थानकापर्यंत उपलब्ध करण्यात आली आहे.

खासगी वाहने स्पेशल रोल कोचने वाहतूक करण्याची ही सेवा आहे. त्याच प्रमाणे एका वाहनातील जास्तीत जास्त तीन व्यक्तींना प्रवासी कोचमध्ये प्रवास करता येतो, अशी ही योजना आहे.

रस्त्यावरील वाहतूक कमी व्हावी यासाठी ही व्यवस्था रेल्वेतर्फे करण्यात येत आहे. या सेवेला कमी प्रतिसाद मिळाला तरी कोकण रेल्वेच्या अधिकारी आशावादी आहेत. पुढील काही दिवसांत आरक्षणात वाढ होईल, अशी अपेक्षा ते बाळगून आहेत.

असा आहे तिकीट दर

कोलाड ते वेर्णापर्यंत एका वाहनासाठी ७,८७५ तिकीट आहे. कोलाड ते नांदगावपर्यंत ५,४६० रुपये तिकीट आहे. त्याच प्रमाणे कारमधील प्रवाशांसाठी प्रत्येकी ९३५ थ्री एसी व प्रत्येकी १९० रुपये दुसरा दर्जा कोच असे तिकिटाचे दर आहेत.

१५ ऑगस्टपर्यंत आरक्षण खुले होते ते १८ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आले आहे. ही सेवा २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत उपलब्ध आहे. जर १६ पेक्षा कमी वाहनांचे आरक्षण झाले तर सेवा रद्द करण्यात येईल. आरक्षणाच्या वेळी ४ हजार रुपये आगाऊ घेतले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: गोव्यात रशियन कुटुंबाकडून बेकायदेशीर 'टॅक्सी व्यवसाय'; यांना कोणाचा 'आशीर्वाद'? स्थानिकांचा सवाल

Mormugao Port: मोठी बातमी! मुरगाव बंदरात कंटेनर व्यवसाय सुरू, SCI जहाज दाखल; ‘एमपीए’बरोबरच राज्यालाही होणार लाभ

Konkani Drama Competition: 'हा कोकणी लेखकांचा अनादर, नाट्य चळवळीला मारक'; राज्यनाट्य स्पर्धा आणि वादांचे साद-पडसाद

Horoscope: धन, यश आणि प्रगती! नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 3 राशींसाठी महायोग, वाचा तुमचं राशीभविष्य

Konkani Drama: गेल्या 50 वर्षांत नाट्यक्षेत्राने घेतलेली हनुमानउडी अधोरेखित होते! सुवर्णमहोत्सवी कोकणी-नाट्यस्पर्धेचे कवित्व

SCROLL FOR NEXT