पणजी: कोकण रेल्वेच्या वतीने मेगा भरतीची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील पात्र उमेदवारांना रेल्वेतील विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
कोकण रेल्वेने एकूण १९० विविध पदांसाठी भरती जाहीर केली असून, १६ सप्टेंबरपासून यासाठी अर्ज करता येईल.
विद्युत विभाग
वरिष्ठ विभाग अभियंता - पाच जागा
यांत्रिक १ आणि २ - १५ जागा
सहाय्यक लोको पायलट - १५ जागा
सिव्हिल विभाग
वरिष्ठ विभाग अभियंता - पाच जागा
ट्रक व्यवस्थापक - ३५ जागा
मेकॅनिकल विभाग
यांत्रिक १ आणि २ - २० जागा
ऑपरेटिंग विभाग
स्टेशन मास्टर - १० जागा
गुड्स ट्रेन व्यवस्थापक - पाच जागा
पॉईंट्स मॅन - ६० जागा
सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन विभाग
ईएसटीएम III - १५ जागा
कमर्शिअल विभाग
कमर्शिअल सुपरवाईझर - पाच जागा
कोकण रेल्वेसाठी जमीन गमावलेल्यांसाठी प्राधान्य
कोकण रेल्वेसाठी जमीन गमावलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातील उमेदवारांसाठी या भरती प्रक्रियेत प्रथम प्राधान्य दिले जाईल. जमीन गमावलेल्यांच्या पत्नी, मुलांना यात संधी दिली जाईल.
जमीन न गमावलेल्यांना दुसरे प्राधान्य
कोकण रेल्वेच्या या भरती प्रक्रियेत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातील जमीन न गमावलेल्या उमेदवारांना दुसरा प्राधान्यक्रम असेल.
कोकण रेल्वेचे कर्मचारी
कोकण रेल्वेत तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना तिसऱ्या क्रमांकाचे प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादा - १८ ते ३६ वर्षे (०१ ऑगस्ट २०२४)
कोरोना महामारीच्या काळात संधी गमावलेल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा ३३ ते ३६ पर्यंत शिथिल करण्यात आली आहे. तर, जातीनिहाय आरक्षणही लागू असेल.
कोकण रेल्वेच्या विविध १९० जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. पात्र उमेदवारांना कोकण रेल्वेच्या संकेतस्थळावर १६ सप्टेंबरपासून ०६ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येईल.
जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी उमेदवारांना कोकण रेल्वेच्या konkanrailway.com या संकेतस्थळाला भेट देता येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.