Konkan Railway Police Margao Arrested Accused Dainik Gomantak
गोवा

Kokan Railway Police: मुका असल्याचे भासवून भिक मागणाऱ्याकडे आढळले तब्बल 2 लाखांचे 11 मोबाईल

कोकण रेल्वे पोलिसांची कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

Arrested Accused From karnataka in mobile Theft : मुका असल्याचे भासवून लोकांच्या घरी भिक मागणाऱ्या एकाला कोकण रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे तब्बल 2 लाख रुपये किंमतीचे 11 मोबाईल फोन सापडले आहेत. तसेच हा चोरटा मुका नसून त्याला बोलता येत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

याबाबत कोकण रेल्वेचे पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मडगाव रेल्वे स्थानकावर संशयित संशयास्पद स्थितीत फिरत असताना रेल्वे पोलिसांनी त्याला हटकले. यावेळी संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

कोकण रेल्वे पोलिस संशयिताचा पाठलाग करीत असताना संशयित धडपडीत जमिनीवर कोसळला. आरपीएफच्या रिंकू यादव आणि एस. राठोड या जवानांनी त्याला जेरबंद केले. यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 11 महागडे मोबाईल सापडले.

संशयित चोरट्याची चौकशी केली असता नाव गोपी असे असून तो मूळ शिमोगा येथील चोरट्यांच्या टोळीचा सदस्य असल्याची माहिती मिळाली. तसेच चोरट्याकडे पोलिसाना 'तो मुका असून त्याला मदत करा' असे लोकांना आवाहन करणारे पत्रही सापडले.

सुरवातीला चौकशी दरम्यान तो मुका असल्याचे नाटक करु लागला मात्र, पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवताच तो बोलू लागला. शिमोगा टोळीतील अन्य सदस्य गोव्यात सक्रीय आहेत का याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांनी दिली.

मुका असल्याचे भासवून लोकांच्या घरी भिक मागताना लोकांची नजर चुकवून ते त्यांचे मोबाईल व इतर वस्तू लंपास करीत असत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT