Konkan Railway Konkan Railway X Handle
गोवा

Konkan Railway: कोकण रेल्वेत डब्यांची संख्या वाढवा! कोकण विकास समितीची मागणी; प्रवाशांना करावा लागतोय अडचणींचा सामना

Konkan Railway Overcrowding: कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची सध्याची क्षमता 168 टक्के इतकी असून, प्रवाशांची वाढती मागणी आणि मर्यादित आसनक्षमता यामुळे रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी होत आहे.

Manish Jadhav

पणजी: कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची सध्याची क्षमता 168 टक्के इतकी असून, प्रवाशांची वाढती मागणी आणि मर्यादित आसनक्षमता यामुळे रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. यामुळे गाड्यांत डबे वाढवावेत, अशी मागणी कोकण विकास समितीची कोकण रेल्वे महामंडळाकडे केली आहे.

प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय!

कोकण विकास समितीने (Konkan Development Committee) दिलेल्या निवेदनात म्हटले की, वर्षभर हीच परिस्थिती दिसून येत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर तात्काळ उपाय म्हणून विद्यमान गाड्यांमध्ये डबे वाढवण्याची गरज आहे.

प्रवाशांची वाढती संख्या

दरम्यान, कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, नवीन गाड्या सुरु करण्याची मागणी होत आहे. मात्र, सध्या धावणाऱ्या गाड्यांमध्ये डबे वाढवणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. यातून प्रवाशांना (Passenger) मोठा दिलासा मिळेल, असे समितीने म्हटले आहे. कोकण विकास समितीचे प्रस्ताव दिले आहेत.‌ हे उपाय अंमलात आल्यास दररोज अंदाजे 3 ‌हजार 691 अतिरिक्त आसनक्षमता (सुमारे 46 डबे) उपलब्ध होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT