Konkan Railway Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway: गोव्यातील दुपदरीकरण कामाचा कोकण रेल्वे वाहतुकीला फटका, अनेक ट्रेन्सला विलंब

Konkan Railway Route Delayed: गती चाचणीनंतर बेंगळुरू येथील रेल्वे सुरक्षा आयुक्ताने योग्यता मान्यता दिल्यानंतर सार्वजनिक वाहतुकीसाठी हा रेल्वे मार्ग खुला करण्यात आला.

Pramod Yadav

Konkan Railway Route Delayed

माजोर्डा-कासावली दरम्यानच्या दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असून, पूर्ण झालेल्या या मार्गावर दहा जून रोजी गती चाचणी घेण्यात आली. या काळात कोकण मार्गावरील अनेक ट्रेन वाहतुकीला फटका बसला. कोकण रेल्वे मार्गावरील अनेक ट्रेन्स विलंबाने धावल्या.

दक्षिण गोव्यातील रेल्वे मार्गावर दुपदरी करणाच्या कामामुळे रविवारपासून कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीला फटका बसला. जवळपास सर्वच ट्रेन्स रविवारपासून सुमारे तीन तास उशीराने धावल्या.

माजोर्डा-कासावली दरम्यानच्या गती चाचणीमुळे ट्रेन्स उशीराने धावल्याची माहिती, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) चे उपमहाव्यवस्थापक बबन घाटगे यांनी पीटीआयला दिली.

माजोर्डा ते कासावली हे साडेचार किलो मीटर अंतर आहे. हे काम वास्को ते तिनईघाट दुपदरीकरण योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात आले आहे.

कोकण रेल्वेने दहा तारखेची सेंट्रेल मुंबई ते मडगाव जंक्शन धावणारी जन्मशताब्दी एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेस चार ते पाच तास उशीराने धावल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने मला श्रीमंत केले; गोव्यातील प्रसिद्ध मच्छीमार 'पेले'ने सांगितला अनुभव

Goa News: मुसळधार पाऊस, अपघात; गोव्यातील दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

ब्रेकअप के बाद... हृदय तुटल्यानंतर Google मधील अडीच कोटी पगाराच्या नोकरीवर मारली लाथ; सुरु केला स्वत:चा व्यवसाय

Asia Cup 2025 Schedule: आशिया कप स्पर्धेतील सामन्यांच्या वेळेत बदल, किती वाजता सुरू होणार सामना? जाणून घ्या

बायकोच्या अफेअरबाबत पतीला कळालं, डंबलने ठेचून तिने नवऱ्याला संपवलं

SCROLL FOR NEXT