Goa GMC Dainik Gomantak
गोवा

Kolkata Doctor Case: गोव्‍यातही डॉक्‍टरांचा ‘आवाज’! मात्र सेवेवर परिणाम नाही

Goa IMA: अत्याचार पीडित मृत महिला डॉक्‍टरला न्‍याय द्यायची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कोलकाता येथे युवा महिला डॉक्टरचा बलात्कार करून खून केल्याच्या निषेधार्थ तसेच त्या डॉक्टरला न्याय मिळावा, यासाठी देशभरासह गोव्‍यातही आरोग्य क्षेत्रही एकवटले. मात्र असे असले तरी डॉक्‍टरांनी गोमेकॉतील सेवेवर त्याचा फारसा परिणाम जाणवू दिला नाही.

गोमेकॉतील बाह्यरुग्ण विभाग आज सुरू नसणार याचा गवगवा काल समाजमाध्यमांवर झाल्याने गोमेकॉसह म्हापसा व मडगावातील जिल्हा इस्पितळात बाह्यरुग्ण संख्या अत्यल्प होती. वरिष्ठ डॉक्टर व सल्लागार डॉक्टर सेवा देत होते. प्राथमिक आरोग्यकेंद्रांतील आरोग्य सेवा मात्र काही प्रमाणात प्रभावित झाली होती.

गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले की, गोमेकॉत दिवसातून दोन वेळा रुग्‍णांची होणारी नियमित तपासणीही करण्यात आली. तातडीच्या शस्त्रक्रियाही करण्‍यात आल्‍या. गोमेकॉच्या एकाही विभागाचा बाह्यरुग्ण विभाग आज बंद राहिला नाही. रुग्णसंख्या मात्र कमी होती,

दरम्‍यान, आरोग्य सेवा संचालनालयाअंतर्गत येणारी जिल्हा इस्पितळे, उपजिल्हा इस्पितळे, कुटिर रुग्णालये, प्राथमिक आरोग्यकेंद्रे व ग्रामीण दवाखान्यांत रुग्णसेवा काही प्रमाणात प्रभावित झाली.

गोमेकॉ निवासी डॉक्टरांचेही आंदोलन; १४ शस्रक्रियाही केल्या

गोवा निवासी डॉक्टर संघटनेनेही आज आंदोलन करत महिला डॉक्टरांवर झालेल्या अत्याच्याराविरोधात आवाज उठविला. यावेळी बोलताना संघटनेचे प्रतिनिधी डॉ. गावस म्हणाले, आम्ही गोमेकॉतील कोणत्याही आपत्कालीन सेवा बंद न करता न्‍यायासाठी रस्‍त्‍यावर उतरलो आहे. ‘गोमेकॉ’त आज आपत्‍कालीन स्‍थितीतील चार सिझेरियन शस्‍त्रक्रिया; इतर १० तातडीच्‍या शस्रक्रिया रात्री ८ वाजेपर्यंत करण्‍यात आल्‍याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांनी दिली.

डॉक्टर म्हणून आम्ही रुग्णसेवा देण्यास प्राधान्य देतो. सदोदित रुग्णांचा विचार प्रथम करतो. त्यामुळे आज एक दिवस ओपीडी बंद केली असली तरी आपत्कालीन सेवा सुरूच ठेवली. ‘आयएमए’ केंद्रीय समितीच्या निर्देशानुसार रविवार सकाळी ६ पर्यंत ओपीडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील निर्णय चर्चा करून घेण्यात येईल.
डॉ. संदेश चोडणकर, ‘आयएमए’ गोवा प्रमुख
गोमेकॉत ८०० रुग्ण दाखल आहेत. त्यांच्यावर आज वरिष्ठ डॉक्टरांनी उपचार केले. दिवसातून दोन वेळा रुग्‍णांची होणारी नियमित तपासणीही करण्यात आली. तातडीच्या शस्त्रक्रियाही करण्‍यात आल्‍या. गोमेकॉच्या एकाही विभागाचा बाह्यरुग्ण विभाग आज बंद राहिला नाही. रुग्णसंख्या मात्र कमी होती, तरीही सल्लागार डॉक्टरनी बाह्यरुग्ण सेवा सुरू ठेवली.
डॉ. शिवानंद बांदेकर, गोमेकॉचे अधिष्ठाता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT