babies Dainik Gomantak
गोवा

Kolhapur-Goa: कोल्हापूरच्या महिलेने पोटच्या मुलीला एक लाख रुपयांना गोव्यात विकले, नोटरीद्वारे झाला व्यव्हार

Kolhapur-Goa Crime News: मुलीला विकत घेतलेले गोव्यातील दाम्पत्य बेपत्ता, पोलिस परतले रिकाम्या हाती

Pramod Yadav

Kolhapur-Goa Crime News

इंगळी (ता. हातकणंगले) येथील महिलेने एक लाख रुपयांना आपल्या पोटच्या मुलीला गोव्यात विकल्याचा प्रकार उघडकीस आला.

मात्र, गोव्यातील दाम्पत्याच्या शोधासाठी गेलेल्या पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले. नोटरी करताना त्यांनी दिलेल्या आधारकार्ड पत्त्यावर दोघेही राहात नसल्याचे समोर आले आहे.

गोव्यात तपासकामी गेलेल्या पथकाने मुलगी घेणाऱ्या फातिमा फर्नांडिसबाबत परिसरात केलेल्या चौकशीत ती बरेच महिने फिरकली नसल्याचे समजले. त्यामुळे चिमुकलीबाबत चिंता वाढली आहे.

पती-पत्नीमधील वादानंतर आईने स्टॅम्पद्वारे नोटरी करत मुलीला एक लाख रुपयांत विकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी मुलीची आई, तिचा मित्र सचिन कोंडेकर, मुलीला विकण्यात मध्यस्थी करणारा किरण पाटील यांना अटक केली आहे. तिघेही २२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत आहेत.

मध्यस्थी किरणने सावध केल्याचा अंदाज

मुलीला विकण्यासाठी किरण पाटील याने मध्यस्थी केल्याची माहिती मुलीचे वडील दिलीप ढेंगे यांना मिळाली होती. मागील आठवड्यात त्यांनी किरण पाटीलची भेट घेऊन मुलीबाबत विचारणा केली होती.

तेव्हा किरणने फातिमा फर्नाडिसला याची माहिती दिल्याने ती बेपत्ता झाली असावी, असा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT