Subhash Phaldesai  Dainik Gomantak
गोवा

Goa News: आज होणार नॉलेज टर्मिनस 0.5चे उद्‌घाटन

गोव्याचा ज्ञान महोत्सव असलेल्या नॉलेज टर्मिनसच्या पाचव्या आवृत्तीचे म्हणणेच परिक्रमा नॉलेज टर्मिनस झिरो पॉइंट फाईव्हचे उद्‌घाटन आज सुभाष फळदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: गोव्याचा ज्ञान महोत्सव असलेल्या नॉलेज टर्मिनसच्या पाचव्या आवृत्तीचे म्हणणेच परिक्रमा नॉलेज टर्मिनस झिरो पॉइंट फाईव्हचे उद्‌घाटन आज समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या कार्यक्रमाला अर्जुन पुरस्कार विजेत्या भक्ती कुलकर्णी, कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे, परिक्रमा नॉलेज टर्मिनसचे अध्यक्ष युगांक नायक, केरी गावच्या सरपंच यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

उद्‌घाटन समारंभामध्ये संस्थेच्या वतीने प्रा. प्रकाश वजरीकर आणि सुभाष जाण यांना परिक्रमा फेलोशिप तर रमा मुरकुंडे यांना डॉ. माधवी सरदेसाई युवा शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परिक्रमा 0.5च्या मुख्य सचिव उर्वशी नाईक यांनी केले आहे.

तीन हजार युवांचा सहभाग

28 आणि 29 रोजी आयोजिण्यात आलेल्या नॉलेज टर्मिनसमध्ये राज्यभरातील सुमारे 30 शैक्षणिक आणि बिगर शैक्षणिक संस्थांतील तीन हजार युवा सहभागी होत आहेत.

यामध्ये शिक्षण, कला आणि क्रीडा उपक्रमाचा प्रामुख्याने समावेश असून गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती खाते तसेच क्रीडा आणि युवा व्यवहार खात्याच्या साहाय्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT