Goa College of Engineering Dainik Gomantak
गोवा

Goa College of Engineering: रोबोटिक्सचे ज्ञान ही काळाची गरज

केतन नाईक : ‘गोमन्तक यीन’तर्फे गोवा आभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यक्रम

दैनिक गोमन्तक

Goa College of Engineering: प्रयत्न केल्यास अशक्य काहीच नाही. विद्यार्थ्यांनी आतापासूनच रोबोटिक्समध्ये कार्य केले तर भविष्यात प्रगत रोबो निर्माण होऊ शकतो. रोबोटिक्सचे ज्ञान ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन एसियर सोल्युशनचे प्रकल्प संचालक केतन नाईक केले गोवा आभियांत्रिकी महाविद्यालयात ‘गोमन्‍तक यंग इन्स्पिरेशन नेटवर्क’तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

रोबोटिक्स शिकताना मानव आणि रोबो यांच्यात काय साम्य अथवा वेगळेपण आहे ते आधी समजून घ्यावे. रोबोनिर्मितीची इच्छा असल्यास हार्डवेअरसोबत सॉफ्टवेअरही शिकून घ्‍या. कोणताही एक प्रकल्प तयार करण्यासाठी जे आपल्या जवळ आहे, तेच वापरा. उगाच महागडे प्रकल्‍प वापरू नका. सर्व संकल्पना समजून घेतल्यावरच रोबो करण्यास सुरूवात करा, असे नाईक म्‍हणाले.

प्रा. अनंत नाईक, प्रा. डॉ. एम. एस. कृपाशंकर उपस्थित होते. प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. श्रेया होसमणी यांनी सूत्रसंचालन तर वैष्णवी गावडे यांनी आभार मानले.

चांगल्‍या कामासाठीच करा रोबोचा वापर

रोबोटिक्स ही आजच्या काळाची गरज आहे. कोणतेही क्षेत्र असो, रोबोमुळे ते काम सहज आणि सोपे झाले आहे. युद्धावेळी एका जवानाचे प्राण वाचविण्यासाठी दुसऱ्या जवानांऐवजी रोबोला पाठविले तर इतर जवानांचे प्राण वाचू शकतात. रोबोचा वापर विध्वंसक कामांसाठी करू नये, चांगल्‍या कामासाठी करावा. सर्वांगीण ज्ञान आत्मसात केल्यावरच प्रगत रोबोची निर्मिती होऊ शकते. त्यासाठी आपण आत्ताच सर्व शिकून घेतले पाहिजे, असे डॉ. एम. एस. कृपाशंकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT