Kendriya Vidyalaya Ponda Dainik Gomantak
गोवा

Kendriya Vidyalaya Ponda: क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्याला मारहाण, कुर्टी-फोंडा येथील प्रकार

कुर्टी-फोंडा येथील प्रकार : केंद्रीय विद्यालयाच्या शिक्षकावर गुन्हा दाखल

दैनिक गोमन्तक

Kendriya Vidyalaya Ponda: कुर्टी-फोंडा येथील केंद्रीय विद्यालयात क्षुल्लक कारणावरून चिडलेल्या एका वयस्क शिक्षकाने आठवीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याने या विद्यार्थ्याला अखेर इस्पितळात उपचारासाठी दाखल करावे लागले.

हा प्रकार मंगळवारी (ता.१२) दुपारी घडला असून याप्रकरणी फोंडा पोलिस स्थानकात बुधवारी (ता.१३) रितसर तक्रार दिल्यानंतर फोंडा पोलिसांनी संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. या मारहाण प्रकरणाशी संबंधित केदारनाथ राम या प्रभूनगर - फोंड्यात राहणाऱ्या शिक्षकाला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या शिक्षकाच्या पँटला काहीतरी लागल्याचे संबंधित विद्यार्थ्याने त्या शिक्षकाच्या निदर्शनास आणल्यानंतर विक्षिप्तपणे विद्यार्थ्याला जोरदार मारहाण केली.

यात विद्यार्थी फळ्यावर आदळला व जखमी झाला. हे प्रकरण घडूनही संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांना काहीच कल्पना दिली गेली नाही.

संशयित शिक्षकाने झाल्या प्रकारासंबंधी गयावया केली, त्यामुळे पोलिसांत तक्रार देण्यास उशीर झाल्याचे समजते. पोलिसांनी संशयित शिक्षक केदारनाथ राम विरोधात कलम ३२३ व गोवा बालहक्क कायदा 8 खाली गुन्हा नोंदवला आहे. सध्या हा विद्यार्थी वैद्यकीय निरिक्षणाखाली असून फोंडा पोलिस चौकशी करीत आहेत. दरम्यान, राज्यात शिक्षकांविरुद्ध अनेक तक्रारी नोंद होत असताना कुर्टीच्या केंद्रीय विद्यालयातही असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

पालकांना उशिरा दिली माहिती

घटना घडली त्यावेळी या विद्यालयाच्या प्राचार्या तेथे नव्हत्या. तसेच आरोग्य सुविधाही उपलब्ध नव्हत्या. उशिरा पालकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी मुलाला घेऊन फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळ गाठले. मुलाची वैद्यकीय तपासणी करून उपचार केले. वर्गातील इतर विद्यार्थ्यांनीही आपल्या सहकारी विद्यार्थ्याची काहीच चूक नसल्याचे सांगितले, असे जखमी झालेल्या मुलाच्या पालकांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

SCROLL FOR NEXT