Arrested Dainik Gomantak
गोवा

अल्पवयीन मुलाला डांबून जीवे मारण्याची धमकी; मुलाच्या आईकडे सात लाखांच्या खंडणीची मागणी

Goa Crime News: पोलिसांकडून संशयिताविरोधात खंडणीची मागणी, अल्पवयीन मुलाचे अपहरणे करणे यासह शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे.

Pramod Yadav

कोलवा: अल्पवयीन मुलाला डांबून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलाचे अपहरण करुन सात लाखांच्या खंडणीची मागणी केली. याप्रकरणी कोलवा पोलिसांनी संशयित मार्कोस मेनिनो डिसोझा (रा. बेताळभाटी) याला अटक केलीय. त्याच्याकडून बुलेटससह दोन बंदुका जप्त करण्यात आलेल्या आहेत.

याप्रकरणी जुलिका फर्नांडिस ई टेलेस यांनी कोलवा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित मार्कोस यांने तक्रारदार जुलिका यांच्या अल्पवयीन मुलाला डांबून ठेवले व जीवे मारण्याची धमकी दिली. मार्कोसने त्यानंतर मुलाचे अपहरण करुन सात लाखांच्या खंडणीची मागणी केली. पैसे देण्यासाठी गेलेल्या तक्रारदार महिलेचा देखील संशयिताने विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी मार्कोसला ताब्यात घेतले व त्याच्याकडून दोन बंदुकांसह बंदुकीच्या गोळ्याही जप्त केल्या. क्रिप्टो चलन व मायनिग मशीन यातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT