Khoshi Lokanche Feast X
गोवा

Khoshi Lokanche Fest : गोव्यात प्रथमच ‘खोशी लोकांचे फेस्‍त’ उत्साहात! आनंद, संस्कृती आणि विविधतेचे दर्शन, घुमट गजालीला प्रतिसाद

Khoshi Lokanche Fest Goa: समाजातील आनंद, विविधता आणि संस्कृतीचा उत्सव ठरलेला ‘खोशी लोकांचें फेस्त’ पणजी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Sameer Panditrao

पणजी: समाजातील आनंद, विविधता आणि संस्कृतीचा उत्सव ठरलेला ‘खोशी लोकांचें फेस्त’ - द हेप्पी पीपल्स फेस्टिव्हल गोवा कॉलेज ऑफ होम सायन्स, पणजी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या समावेशक महोत्सवाचे आयोजन फेस्तकार मारियस फर्नांडिस यांनी केले होते, तर यजमान म्हणून प्राचार्य डॉ. महेश पै आणि कॉलेजचा सहभाग महत्त्वाचा ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात ‘फेस्तकार पसोई’ या अनोख्या ज्ञान-चर्चा फेरीने झाली, जी कॉलेजच्या करघा आणि वस्त्रप्रयोगशाळेत घेण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन सोहळा झाला असून प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने मिगेल ब्रागांझा, अ‍ॅलेक्सिज, अवेलिनो डिसा, निकोल सुआरेस, विली गोस, शेरिल अफोंसो, लुएला डायस आणि फातिमा बर्था फर्नांडिस यांचा सहभाग होता.

निकोल सुआरेस लिखित ‘ऍक्रोस थ्री कॉन्टिनेन्ट : लीगसी ऑफ ऍन्टोनेट्टा फर्नांडिस या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. ग्वेन्डोलिन डी ऑरनेलस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. लेखक विली गोस यांनी कौटुंबिक वारसा जपण्याचे महत्त्व प्रसंगी अधोरेखित केले.

घुमट या गोव्याच्या वाद्याच्या भवितव्यावर मारीयस आणि पत्रकार निकोल यांच्यात ‘घुमट गजाली’ कार्यक्रमात संवाद साधला तर घुमटाच्या आकाराचा केक देखील कापण्यात आला. ५ जी - ग्लोबल गोवन गर्ल्स -घुमट ग्रुपने ‘गोवा बीच’ या गाण्यावर सादरीकरण केले.

‘बालकावचे गजाली’ सत्रात प्रा. शेरिल अफोंसो यांनी डॉ. ग्वेन्डोलिन यांच्याशी महिला आरोग्य व आहार विषयक संवाद साधला. सुमन गोस्वामी यांनी साखरमुक्त गोड पदार्थांवर मार्गदर्शन केले. स्थानिक पदार्थ, शेती उत्पादने व हस्तकला वस्तूंच्या दालनांनी भरलेले बाजार यावेळी आकर्षणाचे केंद्र ठरले. समुपदेशक लुएला डायस यांच्या पुढाकाराने फ्लॅश मॉब, आणि प्रकाश कामत यांच्या विविधता, समावेशकता यावर आधारित कार्यशाळा घेण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "सासष्टीत कोणालाही गृहीत धरु नका!" भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसचा 'मास्टर प्लॅन' तयार; नवनियुक्त कार्याध्यक्षांनी दिले मोठे संकेत

Benaulim Beach Bull Drowning: गोव्यात बंदी असतानाही बाणावलीत बैलांची झुंज; समुद्रात बुडून बैलाचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात खळबळ

Goa Agriculture Subsidy: कार्यालयात बसू नका, शेतात जाऊन मार्गदर्शन करा! मुख्‍यमंत्र्यांनी पिळले अधिकाऱ्यांचे कान; कृषी अनुदान रक्‍कम दोन महिन्‍यांत

Goa Illegal House Case: बांधकाम नियमितीकरणाला जागेची मालकी हवीच! कुचेली अनधिकृत घरप्रकरणी हायकोर्टाने फेटाळली याचिका; काय नेमकं प्रकरण?

Goa Crime: आधी दबा धरुन बसला, मग चाकूने सपासप वार केले! तुयेत नर्सवर तरुणाचा जीवघेणा हल्ला; प्रेमप्रकरणाचा संशय

SCROLL FOR NEXT