Khorli XI beat Arley Club by 123 runs to win  Dainik Gomantak
गोवा

Goa Cricket Association: खोर्ली इलेव्हनने पटकावले राज्यस्तरीय 'विजेतेपद'; फायनलमध्ये आर्ले क्लबचा उडवला धुव्वा

Goa Cricket Association Group A Cricket Tournament: खोर्ली इलेव्हनने गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) अ गट क्रिकेट स्पर्धेत राज्यस्तरीय विजेतेपद पटकावले.

किशोर पेटकर

Goa Cricket Association Group A Cricket Tournament: खोर्ली इलेव्हनने गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) अ गट क्रिकेट स्पर्धेत राज्यस्तरीय विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी आर्ले स्पोर्टस क्लबला 123 धावांनी सहज हरवले. लढत मंगळवारी पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर झाली.

दरम्यान, खोर्ली इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 45 षटकांत 7 बाद 332 धावा केल्या. उत्तरादाखल आर्ले क्लबचा डाव 38.1 षटकांत 209 धावांत संपुष्टात आला. खोर्ली इलेव्हनच्या अमित यादव (नाबाद 79 धावा, 41 चेंडू, 5 चौकार, 6 षटकार), व्हिजन पांचाळ (69 धावा, 48 चेंडू, 3 चौकार व 7 षटकार) व अंकित दाबास (56 धावा, 40 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार) यांनी आक्रमक अर्धशतके नोंदवली.

संक्षिप्त धावफलक: खोर्ली इलेव्हन: 45 षटकांत 7 बाद 332 (आविष्कार मोने 30, राहुल केणी 35, व्हिजन पांचाळ 69, वैभव नाईक 20, अंकित दाबास 56, अमित यादव नाबाद 79, विनायक कुंटे 2-58, अंगदराज 2-57) वि. आर्ले स्पोर्टस क्लब: 38.1 षटकांत सर्वबाद 209 (वैभव माळी 36, अंगदराज 37, संकेत मोरजकर 69, व्हिजन पांचाळ 2-51, आविष्कार मोने 2-34, अभिनंदन ठाकूर 3-24, शुभम झा 2-15).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hockey Asia Cup 2025: आशिया कपमध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच, मलेशियाचा 4-1 नं केला पराभव

Dharbandora Accident: धारबांदोड्यात दुचाकीची कारला धडक, दुचाकीस्वार जखमी

GST 2.0: दूध, औषधं, शालेय साहित्य, विमा... 'या' सेवा आणि वस्तूंवर आता 0% जीएसटी, पाहा संपूर्ण यादी

BITS Pilani: नऊ महिन्यांत पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू; बिट्स पिलानी कॅम्पसमधील मृत्यूबाबत न्यायालयीन चौकशीची मागणी

ODI World Cup 2025: एकदिवसीय विश्वचषक तोंडावर असताना टीम इंडियाला तगडा धक्का! स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर

SCROLL FOR NEXT