Sonali Phogat Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat Case : सोनाली फोगट मृत्यू प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी

खाप महापंचायतीचा हरियाणा सरकारला 23 सप्टेंबरपर्यंत अल्टिमेटम

गोमन्तक डिजिटल टीम

Sonali Phogat Case : उत्तर गोव्यातील हणजुण येथे ड्रग्स पाजून हत्या केलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगट मृत्यू प्रकरण सीबीआयकडे द्यावे, अशी मागणी करत सर्वजातीय खाप महापंचायतीने हरियाणा सरकारवर दबाव वाढवला आहे. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा याचा राजकीय परिणाम भोगावे लागेल असा सज्जड दम महापंचायतीने दिला असून याच मागणीसाठी तीव्र विरोध दर्शवत 24 सप्टेंबरनंतर गोवा खंडपीठात याचिका दाखल करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान सोनाली फोगट हत्या प्रकरणात संशयित सुधीर संगवान आणि सुखविंदर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दोघांनाही म्हापसा कोर्टाने 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. शनिवारी 10 सप्टेंबर रोजी म्हापसा कोर्टात सोनाली फोगट प्रकरणी सुनावणी झाली, त्यावेळी कोर्टाने ही कोठडी वाढवली आहे.

हणजुण पोलिसांनी मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाकडे संशयितांची 4 दिवसांसाठी कोठडी मागितली होती मात्र कोर्टाने आरोपींना 2 दिवसांची कोठडी सुनावली होती. यानंतर गुरुवारी पोलिसांनी दोन्ही आरोपींना पुन्हा कोर्टात हजर करत त्यांच्या वाढीव कोठडीची मागणी केली. कोर्टाने ती मान्य करत आरोपींची पोलीस कोठडी दोन दिवसांनी वाढवली होती. याप्रकरणी म्हापसा कोर्टात आज 10 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी झाली यावेळी दोन्ही आरोपींना कोर्टाने 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाशी संलग्न असलेल्या कर्लीस रेस्टॉरंटचा चालक एडविन नुनिस यास म्हापसा अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी सशर्त जामीन मंजूर केला. यामध्ये संशयितला कर्लीस रेस्टॉरंटमध्ये जाता येणार नाही, ही महत्त्वाची अट घातली आहे. त्याशिवाय परवानगीशिवाय गोव्याबाहेर जाता येणार नाही व तपास कामात हस्तक्षेप करता येणार नाही या अटींचा समावेश आहे.

तसेच दत्तप्रसाद गावकर, रामदास मांद्रेकर व एडविन नुनिस यांना पोलीस कोठडी देण्यात यावी, हा हणजूण पोलिसांनी केलेल्या मागणीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT