अभिनेता गुणाजी dainik gomantak
गोवा

Khandola News : तपोभूमीचे जनकल्याणार्थ व्यापक कार्य

अभिनेता गुणाजी : तपोभूमीवर दत्त गुरूवार उत्साहात साजरा

गोमन्तक डिजिटल टीम

Khandola News : श्री क्षेत्र तपोभूमी त्रिदशकपूर्ती महोत्सवी वर्ष तसेच शोभननाम संवत्सराचा प्रथम दत्तगुरुवार असा योगायोग पूज्य स्वामीजींमुळे मला प्राप्त झाला. अशा महान विभूतींच्या चरणी लीन होण्याचे भाग्य मला मिळाले. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचे व तपोभूमीचे जनकल्याणाच कार्य हे विशाल आणि विश्व व्यापक आहे, असे मत अभिनेता मिलींद गुणाज यांनी व्यक्त केले.

श्री दत्त पद्मनाभ पीठ, श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या पावन सान्निध्यात शोभननाम संवत्सरारंभ विशेष दत्तगुरुवार भक्ति उत्सव उत्साहात संपन्न झाला. अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून पूज्य स्वामीजींचे शुभाशीर्वाद प्राप्त केले, याप्रसंगी ते बोलत होते.सद्‌गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी आशीर्वचनात संबोधित करताना म्हणाले, भारत देश विद्वत्तेसाठी सुपरिचित व विद्वत्तेने परिपूर्ण होता.

देश विदेशातील लोकं विद्यार्जनासाठी येत असत. याच एकमेव कारण म्हणजे आमच्याकडे असलेले समृद्ध ज्ञानाचे भांडार. त्यामुळे ॠषिमुनींनी जे संस्कार, विद्या दिलेली आहे, त्या पुढच्या पर्यंत पोहोचविण्याचं काम हे तपोभूमी गुरुपीठ करीत आहे. संस्कार सहितं विद्या। विद्या संस्कार सहित मिळाली तर विद्या फलदायी होते.

शिक्षणातून संस्कार

शिक्षणातून संस्कार होतात, त्यासाठी उत्तम शिक्षणाची गरज आहे. शिक्षणामध्ये संस्कार नसेल तर ते शिक्षण आपला गर्व, अहंकार वृद्धिंगत करते आणि अहंकार वाढल्याने विद्येचा नाश होतो. या विद्या सा विमुक्तये। विद्या तीच जी आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाते, मुक्ति प्रदान करते. आपल्या अंतरंगामध्ये विराजमान असणाऱ्या आत्माकडे अग्रेसर, आकर्षित करणारी हीच खरी विद्या होय, असे मिलींद गुणाजी यांनी दिली.

पूज्य स्वामीजींनी अभिनेता मिलिंद गुणाजी यांचा गौरव करुन शुभाशीर्वाद प्रदान केले. व्यासपीठावर आमदार प्रेमेंद्र शेट, उद्योजक भूषण कदम, एम्. आर. एफ्. कंपनीचे प्रबंधक गौतम राज, एच्. आर. मॅनेजर सर्वेश हळणकर, सत्गुरु फाउंडेशनच्या अध्यक्षा अॅड्. ब्राह्मीदेवीजी, श्री दत्त पद्मनाभ पीठाचे संचालक मंडळ व मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन श्रीराज शेलार व शुभक्षण नाईक यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

SCROLL FOR NEXT