Kevan Rivona Temple Theft Dainik Gomantak
गोवा

Rivona Temple Theft: गोव्यात आणखी एका मंदिरात दिवसाढवळ्या चोरी! केवण-रिवण येथील देवीच्या अंगावरील दागिने पळवले

Kevan Rivona Temple Theft: स्थानिक नागरिक आनंद गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर सोमवारी सकाळी पूजेनंतर देवीला सुवर्ण अलंकार परिधान केले जातात व रात्री आरतीनंतर ते काढले जातात.

गोमन्तक डिजिटल टीम

सांगे: सांगे तालुक्यातील धानोळे-केवण-रिवण येथील श्री दक्षणा देवी मंदिरात दिवसाढवळ्या चोरीची घटना घडली असून देवीच्या अंगावरील सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.

स्थानिक नागरिक आनंद गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर सोमवारी सकाळी पूजेनंतर देवीला सुवर्ण अलंकार परिधान केले जातात व रात्री आरतीनंतर ते काढले जातात. सोमवारी सकाळी नियमित पूजा करून पुजारी गेल्यानंतर दुपारच्या सुमारास मंदिर परिसरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी दागिन्यांवर हात साफ केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सायंकाळी मंदिरात गेलेल्या भाविकांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर तत्काळ केपे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, सांगे भागात तसेच लोकवस्तीपासून दूर असलेल्या मंदिरे, घरे आणि वृद्ध व्यक्ती राहतात अशा ठिकाणी चोरट्यांकडून रेकी करून चोरीचे प्रकार वाढत असल्याची चर्चा आहे.

पर्यटकाची बॅग चोरणारे दोघे कोलव्यात ताब्यात

कोलवा समुद्रकिनाऱ्यावर रविवारी एका पर्यटकाची बॅग चोरून पळून जाणाऱ्या दोन संशयितांना पर्यटक पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. प्रभू अशोक चौहान व राजू पंडीवाडा अशी या संशयितांची नावे आहेत. या दोघांना मागाहून कोलवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी चोरीला गेलेली बॅग जप्त केली आहे. कोलवा किनाऱ्यावर दर रविवारी पर्यटकांची गर्दी असते. या पर्यटकांना लक्ष्य करण्यासाठी चोरटे किनाऱ्यावर फिरत असल्याने पर्यटक पोलिसांनी पाळत ठेवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: ऐन हिवाळ्यात उन्हाचा तडाखा; तापमानाचा पारा 36 अंशांवर, म्हापशात 38.8 अंशांची नोंद; उष्म्याने लोक हैराण

Accident Death: दिवाळीत काळाचा घाला; अपघातांत तिघांचा मृत्‍यू, दोडामार्ग येथे अपघातात दोघांचा मृत्यू; वास्को येथील दुचाकीस्वार जागीच ठार

Mudukud Mobile Network Outage: संपर्क साधायचा कसा? मुडकूडमध्ये 20 दिवसांपासून मोबाईल नेटवर्क ठप्प! नागरिकांची मोठी गैरसोय

आरोपीला 48 तासांत अटक करा; 4 वर्षीय मुलीवरील अत्याचारप्रकरणी काँग्रेस आक्रमक, म्हापसा पोलिस ठाण्यावर धडक

Mapusa Girl Assault Case: बालिकेवरील अत्‍याचाराने म्‍हापसा हादरले! दिवाळीच्या रात्री अमानुष कृत्य; फुगे विकणाऱ्या कुटुंबातील चिमुरडी अत्याचाराची बळी

SCROLL FOR NEXT