Ponda Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात आजपासून केसरबाई संगीत संमेलन

मान्यवरांचा सहभाग, संध्याकाळी 5 वाजता राजीव गांधी कला मंदिरात उद्‍घाटन.

दैनिक गोमन्तक

पणजी: कला अकादमीचा प्रतिष्ठेचा 41 वा सूरश्री केसरबाई केरकर संगीत संमेलन 14, 15 व 16 जानेवारी या कालावधीत राजीव गांधी कला मंदिर, फोंडा (Ponda) येथे होणार आहे. सदर महोत्सवाचे उद्‍घाटन शुक्रवार 14 रोजी सायंकाळी 5 वा. कला अकादमीचे सदस्य सचिव विनेश आर्लेकर यांच्या हस्ते होईल.

रितिष्का वेर्णेकर (शास्त्रीय गायक): रितिष्का वेर्णेकर यांचा जन्म संगीताची परंपरा असलेल्या परिवारात झाला व त्यांनी गायकिचे प्राथमिक धडे त्यांचे वडील श्री. चंद्रकांत वेर्णेकर यांच्याकडून घेतले व त्यानंतरचे धडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रशिक्षण डॉ. शशांक मक्तेदार यांच्याकडून घेत आहे.

पं. दीपक क्षीरसागर : पं. दीपक क्षीरसागर हे दुर्मिळ आणि प्रतिभाशाली संगीतकारांपैकी एक आहेत, जे संगीत क्षेत्रात भारतीय शास्त्रीय गायन आणि गिटार या दोन्हींसाठी तितकेच प्रसिध्द आहेत. त्यांनी आपले आजोबा, ग्वाल्हेर-किराणा घराण्याचे प्रसिध्द गायक, पं. बी.एन. क्षीरसागर आणि पं. सतीश खानवलकर यांच्याकडून संगीताची तालीम घेतली.

धनंजय हेगडे : संगीतमय कुटुंबात जन्मलेला धनंजय हा एक तरुण आणि प्रतिभावान हिंदुस्थानी शास्त्रीय गायक असून त्यानी वयाच्या चौथ्या वर्षी आपल्या आई श्रीमती गीता हेगडे यांच्याकडून संगीताचे प्राथमिक धडे घेतले. धनंजय यांचे वडिल श्री. जी. एस. हेगडे हे प्रसिध्द तबला वादक आहेत आणि “सप्तक" या संगीत संस्थेचे संस्थापक आहेत.

शाकिर खान : सतार वादनातील प्रख्यात गुरु उस्ताद शाहिद परवेझ खान यांचे सुपुत्र आणि शिष्य असलेले शाकिर खान हे त्यांच्या समकालीन पिढीतील एक नावाजलेले सतार वादक असून इटावा घराण्याच्या सर्वात आश्वासक तरुण प्रवर्तकांपैकी एक आहेत तसेच ते त्यांच्या संगीत प्रतिभेच्या वंशपरंपरेतील आठव्या पिढीचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

सोनिक वेलिंगकर : संगीतमय वातावरणात वाढलेले सोनिक वेलिंगकर यांनी वयाच्या 10 व्या वर्षी आपले बासरीवादनाचे प्रथमिक धडे त्यांचे गुरु श्री. मोहन म्हार्दोळकर यांच्याकडून घेतले. त्यांना बेंगळुरु येथील पं. व्यंकटेश गोडखिंडी यांच्याकडून बासरीवादनाचे महत्त्वाचे धडे घेण्याची संधी मिळाली.

संगीता कट्टी कुलकर्णी : या भारतातील कलाकारांच्या तरुण ब्रिगेडमधील प्रमुख हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका, संगीतकार, पार्श्वगायिका आहेत. त्यांना 2006 मध्ये कर्नाटक सरकारकडून प्रतिष्ठित सुवर्ण कर्नाटक राज्योत्सव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पं. योगेश साम्सी : प्रख्यात गायक पं. दिनकर कैकिणी यांचे सुपुत्र असून त्यांनी प्रशिक्षण वडीलांकडून घेतले आणि नंतर पं. एच. तारानाथ राव यांच्याकडून घेतले.

स्वप्नील भिसे : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक आश्वासक तबला वादक असून त्यांने वयाच्या तिस-या वर्षी सद्गुरु श्री. चंद्रकांत भोसेकर यांच्याकडून संगीताचे प्रारंभिक धडे घेतले.

चंद्रशेखर गांधी : संगीताने समृध्द कुटुंबात जन्मलेल्या चंद्रशेखर गांधी यांनी वायाच्या चौथ्या वर्षापासून तबलावादनाची सुरुवात केली. त्यांचे वडील आणि गुरु श्री रवी गांधी हे एक प्रसिध्द तबलावादक असून तबला क्षेत्रातील सर्वात ज्येष्ठ सदस्यांपैकी एक आहेत. चंद्रशेखर यांना महान तबलावादक पं. पंढरीनाथ नागेशकरजी आणि पं. राजेंद्र अंतरकरजी यांच्याकडून शिकण्याचे भाग्य लाभले आहे. याशिवाय इतर मान्यवर कलाकार सहभागी होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT