Bahubali vs Ganesh elephant fight Dainik Gomantak
गोवा

Dodamarg: दोडामार्गमध्ये ‘बाहुबली’-‘गणेश’ हत्तींमध्ये जुंपणार युद्ध? केर परिसरात 7 हत्तींचा वावर; वनविभागासमोर मोठे आव्हान

Dodamarg Elephant Fight: वनविभागाला मिळालेल्या लोकेशननुसार केर गावात सहा हत्तींचा कळप पोहोचला आहे. त्यांचा वावर गावातील तळीच्या वरच्या बाजूस खासगी वनक्षेत्रात आहे.

Sameer Panditrao

दोडामार्ग: सहा हत्तींच्या कळपाचा वावर केर गावातील तळीच्या वरच्या बाजूला आहे, तर ‘बाहुबली’सुद्धा केरमध्ये दाखल झाला असून घाडवस मंदिराजवळ येऊन पोहोचला आहे. ‘बाहुबली’ हत्ती कळपाला येऊन मिळाला, तर ‘गणेश’ व ‘बाहुबली’ यांच्यात युद्ध जुंपण्याची तीव्र शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासाठी वनविभागाने हत्तींच्या मार्गावर ठिकठिकाणी गस्त वाढविली असून हत्तींच्या कळपाला रानातच थोपवून धरण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

घोटगे गावात ठाण मांडून असलेल्या हत्तींच्या कळपाने आता आपला मोर्चा केर गावाच्या दिशेने वळविला आहे. वनविभागाला मिळालेल्या लोकेशननुसार केर गावात सहा हत्तींचा कळप पोहोचला आहे. त्यांचा वावर गावातील तळीच्या वरच्या बाजूस खासगी वनक्षेत्रात आहे. गणेश, ओंकार, छोटी मादी, मोठी मादी व दोन पिल्ले (एकूण ६) यांचा यात समावेश आहे.

घाटमाथ्यावर स्थिरावलेल्या बाहुबली टस्कराने चार दिवसांपूर्वी पुन्हा तिलारी कार्यक्षेत्रात हजेरी लावली. हा बाहुबलीही केर गावात दाखल झाला आहे. कळपापासून काही अंतरावर तो आहे. या कळपाचे नेतृत्व याआधी बाहुबलीकडे होते. त्यावेळी गणेश टस्कर छोटा व अल्प ताकदीचा होता; मात्र कालांतराने त्याच्यात शारीरिक बदल झाले. त्यानंतर कळपाच्या नेतृत्वासाठी तो दावेदार बनला.

यातूनच गेल्या वर्षी बाहुबली आणि गणेश हत्ती यांच्यात युद्ध जुंपले होते. या युद्धात गणेशचे बळ बाहुबलीवर भारी पडले. गणेशने बाहुबलीला पळवून लावले आणि कळपाचा ताबा आपल्याकडे घेतला. हा दोघांमधील संघर्षाचा प्रकार अद्यापही कोणी विसरलेला नाही. आता पुन्हा बाहुबलीचे आगमन झाले आहे. बाहुबली कळपापासून काही अंतरावरच आहे.

कळपाची आणि बाहुबलीची भेट झाली तर, गणेश आणि बाहुबली यांच्यात युद्ध जुंपणार, हे निश्चित असल्याचे प्राणी अभ्यासक सांगतात. याचे परिणाम काय उद्भवतील हे सांगता येणार नाही. कारण या दोघांत जर युद्ध जुंपले तर त्या भीतीने कळपातील अन्य मादी, पिल्ले यांच्यावर परिणाम होऊ शकतो.

नेतृत्वाची झुंज

गतवर्षी जूनच्या सुरुवातीला बाहुबली व गणेश यांच्यात बांबर्डे येथे झुंज जुंपली होती; मात्र, या झुंजीत बाहुबलीवर गणेश भारी पडताच बाहुबलीने काढता पाय घेत पलायन केले होते. तेव्हापासून या कळपाचे नेतृत्व गणेश हत्ती करीत आहे. वर्षभराच्या कालावधीनंतर परतलेला बाहुबली कळपाच्या नेतृत्वाची जबाबदारी पुन्हा आपल्याकडे घेईल, की गणेशसमोर जाण्याचे टाळेल? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT