Tamnar Power Project Goa Dainik Gomantak
गोवा

Tamnar Project: गोव्‍यासमोर कर्नाटकची नरमाईची भाषा! ‘तम्नार’बाबत फेरविचार करणार; राज्‍याने दाखवली ‘ताकद’

Tamnar Power Project Goa: ‘म्हादईचे पाणी वळवू देण्यास गोवा सरकार मंजुरी देत नाही तोपर्यंत तम्नार प्रकल्पाला कर्नाटकच्या हद्दीत परवानगी दिली जाणार नाही’ अशी भूमिका कर्नाटक सरकारने घेतली होती.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यात वीज आणणाऱ्या ‘तम्नार’ वीज प्रकल्पाला परवानगी देण्याबाबत कर्नाटकने आता नरमाईची भूमिका घेणे सुरू केले आहे. यापूर्वी, ‘म्हादईचे पाणी वळवू देण्यास गोवा सरकार मंजुरी देत नाही तोपर्यंत तम्नार प्रकल्पाला कर्नाटकच्या हद्दीत परवानगी दिली जाणार नाही’ अशी भूमिका कर्नाटक सरकारने घेतली होती.

कर्नाटकच्या या आक्रमक भूमिकेमुळे तेथून या प्रकल्पाद्वारे वीज मिळणार नाही असे गृहीत धरून गोव्याने उत्तर व दक्षिण गोव्‍याला जोडणारी थिवी ते शेल्डे अशी वीजवाहिनी घातली. उत्तरेतून मिळणारी वीज दक्षिण गोव्यात नेण्याची व्यवस्थाही केली. त्‍याचा परिणाम लवकरच दिसून आला. आपल्‍यामुळे गोव्याचे काही अडणार नाही असे लक्षात आल्यानंतर कर्नाटकने घूमजाव करत आपल्याच भूमिकेचा फेरविचार करणे आता सुरू केले आहे.

कर्नाटकचे वन, पर्यावरणमंत्री ईश्‍‍वर खांड्रे यांनी मार्च २०२४ मध्ये वनजमिनीच्या रूपांतरास स्पष्ट नकार देत संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस देण्याचे आदेश दिले होते. परंतु २५ मार्च २०२५ रोजी प्रधान मुख्य वनसंरक्षक बृजेश कुमार यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहून प्रकल्प वापरकर्त्या संस्थेला मार्ग बदलण्याचा व आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला दिला.

त्‍‍यानंतर आता १२ जून रोजी बेळगाव, धारवाड व उत्तर कन्नड वनवृत्तातील मुख्य वनसंरक्षकांना संबंधित उपवनसंरक्षकांमार्फत सुधारित प्रस्ताव घेण्याचे आदेश देण्यात आले. या पत्राची प्रत गोवा-तम्‍नार ट्रान्समिशन प्रा. लि. या संस्थेलाही देण्यात आली.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये

एकूण लांबी ९४ किमी

पैकी कर्नाटकच्‍या जंगलातून जाणारा भाग ७२ किमी

अंशी-दांडेली व्याघ्र प्रकल्पातून जाणारा भाग ६.६ किमी

वीजवाहिनीची क्षमता ४०० केव्ही

वनजमिनीचे रूपांतर : १७४६५२ हेक्टर (सुमारे ४३५.५८ एकर)

झाडांची होणारी कत्तल : सुमारे ७३,००० पैकी ३५% झाडे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

देशवासीयांनो आता फक्त 'स्वदेशी' वापरा, वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

"बँका कर्ज देत नसल्यास माझ्या कार्यालयाशी संपर्क साधा", CM सावंतांचे शेतकऱ्यांना आवाहन

Quepem: बारा लाखांचे दागिने पळविले; पण गुन्‍हाच नोंद नाही! FIR नोंदवायचा नसल्याच्या तक्रारदाराच्या सबबीची केपे पोलिसांकडून ढाल

Goa Accident: वेळगे-सत्तरीत भटक्या गुरांमुळे दुचाकीचा अपघात, एक जखमी

'त्या' ग्रामसेवकावर कारवाई अटळ, पंचायत सचिव बनणे भोवले; उद्या निलंबन आदेश शक्य

SCROLL FOR NEXT