Mahadayi Water Issue |Karnataka CM Basavaraj Bommai  Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: कर्नाटकचा अर्थ'संकल्प', कळसा-भांडूराचे पाणी वळविण्यासाठी 1000 कोटींची तरतूद

बोम्मईंनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

Rajat Sawant

Mahadayi Water Dispute: कळसा भांडूराचे पाणी वळविण्याच्या योजनेसाठी कर्नाटकच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज 1000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. प्रकल्पांना परवानगी दिल्याबद्दल यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज अर्थसंकल्प मांडला. बोम्मई सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. निवडणुकीचे वर्ष असल्याने अर्थसंकल्पात अनेक लोकाभिमुख घोषणा केल्या आहेत. राज्य सरकारचा 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 3.09 लाख कोटी रुपये आहे.

केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकला दिलेल्या डीपीआर मंजुरीबाबत राज्य सरकारच्या वतीने दाखल इंटरलोक्युटरी अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी न्यायालयाने कर्नाटकला खडेबोल सुनावत सर्व वैधानिक परवानग्या घेतल्याशिवाय कळसा, भांडुरा प्रकल्पाचे कोणतेच काम करता येणार नाही असे सांगितले होते.

तसेच उपनद्यांचे पाणी देखील वळवता येणार नाही, अशी स्पष्ट तंबी दिली होती. न्यायालयाच्या या निर्णयामुळे म्हादईप्रश्‍नी गोव्याला काहीसा दिलासा मिळाला होता.

कर्नाटकला कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी मंजूर केलेल्या डीपीआरनुसार म्हादईचे पाणी वळवण्यास कर्नाटकला बंदी घालावी, यासाठी दाखल करण्यात आलेल्या हस्तक्षेप अर्जावर सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: शिवोलीत 8.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नायजेरियन नागरिकाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

Goa Cashew: अस्सल गोमंतकीय काजू जगभरात पोहोचवणार! डॉ. दिव्या राणे यांचा विश्‍वास, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य

SCROLL FOR NEXT