South Goa Dainik Gomantak
गोवा

South Goa Liquor Ban: कर्नाटक विधानसभा निवडणूक! दक्षिण गोव्यातील 'या' भागात मद्य विक्रीस बंदी, असे आहेत नियम

नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांचा मद्य विक्री परवाना रद्द केला जाऊ शकतो.

Pramod Yadav

South Goa Liquor Ban: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध प्रकार टाळण्यासाठी सध्या प्रशासन सतर्क झाले आहे. त्यासाठी कर्नाटकसह गोव्यात देखील काळजी घेतली जात आहे.

शिवाय गोव्यातून कर्नाटकमध्ये अवैध दारू वाहतूक होऊ नये यासाठी सर्व तपासणी नाके सध्या कसून चौकशी करत आहेत.

दरम्यान, दक्षिण गोव्यात देखील काही भागात कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्रीस बंदी घातली आहे.

(Ban on Sale of Liquor in the South Goa District within 5kms from the Karnataka Border)

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू यांनी याबाबत आदेश काढले आहेत. आदेशानुसार, कर्नाटक राज्याला लागून असलेल्या पाच किमीच्या गोव्यातील हद्दीत मद्य विक्रीला बंदी असेल. 08 मे सायंकाळी 05 वाजता लागू होणारी ही बंदी 10 मे सायंकाळी सहा वाजेपर्यंत असेल असे आदेशात म्हटले आहे.

तसेच, 13 मे रोजी सकाळी सहा ते 14 मे सकाळी सहा वाजेपर्यंत कर्नाटक सीमेला लागून असलेल्या पाच किमी हद्दीत मद्य विक्रीस बंदी असणार आहे. असे आदेशात म्हटले आहे.

मद्य विक्रीस बंदी करण्याबाबत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी विनंती करण्याबाबत पत्र लिहले होते.

त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आदेशानुसार वरील काळात संबधित भागातील मद्य दुकाने, बार यांनी नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांचा मद्य विक्री परवाना रद्द केला जाऊ शकतो.

तसेच, याकाळात बार आणि रेस्टॉरंट अशी दुय्यम सेवा देणाऱ्या दुकानांना या काळात केवळ जेवण देता येईल. असे आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Rajyog 2026: 16 सप्टेंबरला आकाशात घडणार मोठा चमत्कार! गुरु-चंद्राचा दुर्मिळ 'नवपंचम राजयोग'; 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Five State Assembly Elections: 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा वेध! 'जेन-झी' मतदार ठरणार गेमचेंजर; मोदी सरकारसमोर तरुणांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान

VIDEO: 'ट्रॉफी चोर, ट्रॉफी चोर'! टीम इंडियाच्या विजयानंतर मोहसिन नक्वीची फजिती; भारतीय चाहत्यांच्या घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल

BRICS India: सेतू बांधला, पण 'किंतु-परंतु' कायम! ब्रिक्समध्ये भारताचा राजनैतिक प्रभाव वाढला; मात्र चीन-रशियासोबतची प्रचंड व्यापारतूट ठरतेय मोठे आव्हान

Children Health: गोव्यात सर्दी-खोकला-तापाच्या विषाणूजन्य आजारांचा वाढता प्रादुर्भाव! लहान मुलांमध्ये प्रमाण लक्षणीय; गोमेकॉत रोज 12 रुग्ण दाखल

SCROLL FOR NEXT