Karmal Ghat Dainik Gomantak
गोवा

Karmal Ghat : करमलघाट रुंदीकरण कामात अडथळा; नागरिक मात्र संतप्त

गोमन्तक डिजिटल टीम

Karmal Ghat : काही दिवसांपूर्वी करमलघाटातील वळणावर जिथे अपघाताची घटना घडली होती. त्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या कामास वनखात्याच्या अधिकाऱ्याने आक्षेप नोंदवला आहे. वनखात्यातर्फे ना हरकत दाखला दिला नसल्याचे सांगून त्यांनी हे काम रोखले. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याने निविदा काढून रस्ता रूंदीकरणाचे काम कंत्राटदार सी.ए महमद यांना दिले होते. आज कंत्राटदार जेसीबी तसेच सर्व साहित्य व कामगारांना घेऊन या धोकादायक वळणाच्या रूंदीकरणाचे काम करण्यास आला असता वनखात्याच्या अधिकाऱ्यानी त्यांना आडकाठी आणली.

या संदर्भात कंत्राटदार महमद यांच्याशी संपर्क साधला असता सार्वजनिक बांधकाम खात्याने वनखात्याची परवानगी घेतली नसल्याने कामास सुरुवात केली असता ते बांधकाम साहित्य जप्त करण्याची शक्यता होती, त्यामुळे आपण सर्व साहित्य तेथून हलविल्याचे ते म्हणाले.

यासंदर्भात माजी आमदार विजय पै खोत म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सहाय्यक अभियंते सागर शेट यांना संपर्क करून पुढील उपाय योजना करण्याकरता उद्या (ता.२२) सकाळी ९.३० वाजता चर्चा करण्यात येणार आहे.

...तर अपघात वाढतील

माजी नगराध्यक्ष दिलीप केंकरे म्हणाले, की नुकताच झालेल्या अपघातात वरुण गांधी या युवकाच्या मृत्यू झाला होता. या मृत्यूस काही प्रमाणात सरकारही जबाबदार आहे. पावसापूर्वी हे काम झाले नाही तर याठिकाणी मोठ्या संख्येने अपघात होतील. त्यामुळे लवकरात लवकर उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT