Karaswada Chhatrapati Shivaji Maharaj Statue Vandalised Dainik Gomantak
गोवा

करासवाडा छत्रपती शिवरायांच्या पुतळा विटंबणा प्रकरणी पोलिसांना मोठे यश, संशयितांनी दिली महत्वाची माहिती

संशयितांकडे चौकशी दरम्यान पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती लागली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Karaswada Chhatrapati Shivaji Maharaj statue Desecration: करासवाडा- आकय येथील येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञातांनी विटंबना केल्याचा प्रकार 14 ऑगस्ट रोजी उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली होती. संशयितांकडे चौकशी दरम्यान पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती लागली आहे.

शिवरायांच्या पुतळ्याची विटंबणा केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी नायजेल फॉन्सेका (41, आकय), आलेक्स फर्नांडिस (51, आकय), लॉरेन्स मेंडीस (40, थिवी) या तिघांना 6 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी संशयितांची चौकशी असता त्यांनीच हा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.

संशयितांनी गुन्हा करताना वापरलेला दगड आणि महाराजांच्या पुतळ्याचा तुटलेला चेहरा देखील पोलिसांना मिळाला आहे. तसेच, घटना घडली त्यावेळच्या प्रत्यक्षदर्शीचा देखील जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

सोमवारी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबणा केल्याचा प्रकार उघडकीस आला, त्यानंतर शिवप्रेमींनी आक्रमक भूमिका घेत दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी याप्रकरणात तिघांना अटक केली.

दरम्यान, शिवप्रेमींनी संयम बाळगून तसेच एकतेचे प्रतीक दाखवत त्याच दिवशी संध्याकाळी सिंहासनाधिष्ठीत नवीन पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. ख्रिस्‍तीधर्मीय आमदार कार्लुस फेरेरा यांनी शिवरायांच्‍या पुतळ्याला पुष्‍पहार अर्पण करून दुग्‍धाभिषेकही केला. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT