Karapur suspicious death Dainik Gomantak
गोवा

Karapur Death: बहीण बाहेरून आली, घरात आढळला मृतदेह; कारापूरातील घटनेचे वाढले गूढ; 'त्या' महिलेवर आधीही हल्ला झाल्याची माहिती समोर

Karapur suspicious death: हा अपघात नसून घातपाताचा प्रकार असल्याचा संशय ‘गाकुवेध’ महासंघासह मृत महिलेच्या नातलगांनी व्यक्त केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: कारापूर येथे सुमारे ५५ वर्षीय अविवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला असून विजेचा ‘शॉक’ लागून तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, हा अपघात नसून घातपाताचा प्रकार असल्याचा संशय ‘गाकुवेध’ महासंघासह मृत महिलेच्या नातलगांनी व्यक्त केला आहे. वासंती रामा सालेलकर असे मृत महिलेचे नाव असून त्या अनुसूचित जमात समाजातील होत्या.

न्यायप्रविष्ठ भाटातील ज्या घरात त्या राहत होत्या, त्या घरात आज सकाळी त्या मृतावस्थेत आढळून आल्या. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी पंचनामा करून वासंती हिचा मृतदेह ताब्यात घेवून तो वैद्यकीय तपासणीसाठी बांबोळी येथे ‘गोमेकॉ’त पाठविला आहे. वैद्यकीय तपासणीनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, सायंकाळी श्वान पथकाला पाचारण करून तपास करण्याचा प्रयत्न केला असता, महत्त्वाचे संशयास्पद असे कोणतेच धागेदोरे मिळाले नाहीत. फॉरेन्सिक विभागानेही घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

वासंती कारापूरमधील कोळशे कातर या नावाने ओळखण्यात येणाऱ्या भाटात असलेल्या घरात राहत होत्या. ज्या भाटात त्या राहत होत्या, त्या भाटाच्या मालमत्तेचा विषय गेल्या काही वर्षांपासून न्यायप्रविष्ठ आहे. मालमत्तेच्या वादातून यापूर्वी वासंती यांच्यावर दोन ते तीनवेळा हल्ले झाले होते, अशी माहिती वासंती यांच्या नातेवाईकांकडून मिळाली आहे.

बहीण नसताना घटना

वासंती या भाटातील घरात एकट्याच राहत होत्या. त्यांच्यावर पुन्हा हल्ला होईल या भीतीने पिळगाव येथील त्यांची बहीण त्यांच्यासोबत राहत होती. मात्र, कालोत्सवानिमित्त ती कालच पिळगाव येथे गेली होती. त्यामुळे रात्री वासंती घरात एकट्याच होत्या. सकाळी बहीण कारापूर येथे आली असता, वासंती घरात मृतावस्थेत आढळून आल्या. घरी एकट्याच असताना वासंती हिचा झालेला संशयास्पद मृत्यू हा घातपात असू शकतो. अशी शक्यता ओमप्रकाश कवळेकर यांच्यासह अन्य नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT