डिचोली: वाठादेव येथील झांट्ये महाविद्यालयासमोरील तिळारी कालव्याजवळील कचरा हटवून परिसर स्वच्छ केल्यानंतर अवघ्या २४ तासांतच पुन्हा कचरा टाकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी दुपारी कालव्याच्या बाजूला बिअरच्या मोठ्या रिकाम्या बाटल्या आणि टाईल्सचे तुकडे टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले.
या प्रकारामुळे कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रात संताप व्यक्त होत असून, कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शनिवारी या परिसरात निळ्या रंगाचे एक वाहन उभे असल्याचे दिसून आले. या वाहनातूनच कचरा टाकण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
झांट्ये महाविद्यालयाजवळील तिळारी कालव्याच्या बाजूला यापूर्वी मोठ्या प्रमाणात सुका व ओला कचरा, तसेच ब्रॉयलर अंड्यांची कवचे आणि अन्य दुर्गंधीयुक्त कचरा टाकण्यात आला होता. त्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली होती. तसेच कालव्याच्या प्रदूषणासह रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.