Karapur  Dainik Gomantak
गोवा

Karapur News : कारापुरातील ‘तो’ कचरा अखेर हटवला; दुर्गंधी दूर

Karapur News : पंचायतीतर्फे कार्यवाही, ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त

गोमन्तक डिजिटल टीम

Karapur News :

डिचोली, कारापूर येथे भर लोकवस्तीजवळ रस्त्याच्या बाजूने साचलेला कचरा अखेर काढल्याने कारापूर वासियांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. साचलेल्या या दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे भर लोकवस्तीजवळ मोठी गंभीर समस्या निर्माण झाली होती.

गेल्या सोमवारी (ता.११) दै. ''गोमन्तक''मधून ''कारापुरात कचरा समस्या गंभीर'' अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध होताच पंचायतीने शीघ्रगतीने हालचाली करून हा कचरा काढला. महिला कामगारांनी दोन दिवस लागून हा कचरा हटविला.

कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रात पुन्हा कचऱ्याच्या समस्येने डोके वर काढले असतानाच, चक्क पंचायतीकडूनच भर लोकवस्तीत कचरा ''डंप'' करण्याचा प्रकार घडला होता.

पूर्वाश्रमीच्या पंचायत इमारतीजवळ रस्त्याला टेकून मोठ्या प्रमाणात कचरा डंप करण्यात आला होता. जवळपास आठ-दहा दिवसांपासून हा कचरा पडून होता. साचलेल्या या कचऱ्यामध्ये प्लास्टिकसह सुका आणि ओला कचराही होता.

प्लास्टिकचा वापर टाळा

राज्यात सगळीकडे कचऱ्याच्या राशी दिसत आहेत. शहराच्या ठिकाणी खाद्य पदार्थांचे गाडे उभे असतात.त्या परिसरातही मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. प्लॅस्टिकचा वापर वाढल्यामुळे रस्त्यांच्या कडेला प्लॅस्टिकचा कचरा वाढत आहे. या कचऱ्यावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनी जागृत होणे गरजे आहे, असे मत डिचोलीतील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.

भविष्यात असा प्रकार नको!

हा कचरा कुजून मोठी समस्या निर्माण झाली होती. कचऱ्यातील शिळे अन्नपदार्थ खाण्यासाठी गुरेही कचऱ्यावर तुटून पडत होती. त्यामुळे कचरा रस्त्यावर विखुरला होता. कचरा कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती.

रस्त्यावरुन ये-जा करताना तर लोकांना नाक मुठीत धरावे लागत होते. परिसरात रोगराईही पसरण्याची भीती होती. मात्र आता हा कचरा काढल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. हा परिसर स्वच्छ झाल्यामुळे दुर्गंधीही कमी झाली आहे. भविष्यात असा प्रकार करू नये, असे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT