Jail Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कारापूर येथे गाडी अडवली, जीवे मारण्याची धमकी देत मागितली 10 लाखांची खंडणी; डिचोलीतील 2 तरुणांना अटक

Goa Extortion Case: जीवे मारण्याची धमकी देऊन दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन युवकांना डिचोली पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात संशयितांनी वापरलेली वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

Sameer Panditrao

डिचोली: जीवे मारण्याची धमकी देऊन तब्बल दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन युवकांना डिचोली पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात संशयितांनी वापरलेली वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

सलमान खान (वय २६ वर्षे, रा. खोर्ली-जुने गोवे) आणि मकसूद खान (वय २९ वर्षे, भोम-फोंडा) अशी संशयितांची नावे आहेत. धमकी आणि खंडणी मागण्याची ही घटना ८ जून रोजी रात्री डिचोली-साखळी मुख्य रस्त्यावरील कुळण-कारापूर येथे घडली होती.

यासंबंधीची माहिती अशी की, केरी-सत्तरी येथील मुआज शेख हा युवक साखळीहून मोपा येथे जाताना ही घटना घडली होती. कारापूर येथे मागून येणाऱ्या युवकांनी मुआज शेख यांची गाडी अडवून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली.

मात्र, पोलिस येत असल्याची कुणकुण लागताच संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केले होते. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी गुन्हा नोंद करून पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला होता. संशयितांना अटक केल्याने या प्रकरणामागील सत्य आता समोर येण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT