Karnataka protest by blocking kadamba bus Dainik Gomantak
गोवा

Mhadei River Dispute: ‘कदंब’ अडवून कन्नड संघटनांची घोषणाबाजी!

Karnataka: बेळगावात कार्यकर्ते बसवर चढले, ‘प्रवाह’चा दौरा झोंबला

गोमन्तक डिजिटल टीम

म्हादई प्रवाह प्राधिकरणाने रविवारी (ता. ७) खानापूर तालुक्यात केलेल्या पाहणीच्या विरोधात आज येथील कन्नड संघटनेकडून बेळगाव-पणजी (जीए०३-एक्स०२५६) कदंब बस अडवून आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी बसवर चढून गोवा सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. येथील चन्नम्मा चौकात हे आंदोलन करण्यात आले.

आज दुपारी झालेल्या आंदोलनामुळे चन्नम्मा चौकातील वाहतूक तासभर विस्कळित झाली. शिवाय बेळगावहून कदंबा बसमधून गोव्याकडे निघालेल्या प्रवाशांचीही गैरसोय झाली. आंदोलनामुळे कदंबा बस अर्ध्या तासाहून अधिक काळ चन्नम्मा चौकात थांबून होती.

बस थांबवून आंदोलन सुरू केल्याने चालक, वाहक व प्रवासी धास्तावले. आंदोलकांकडून बसची तोडफोड केली जाण्याची भीतीही व्यक्त झाली. मात्र खडेबाजार पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कडक बंदोबस्त तैनात केला. बसवर दगडफेक होऊ नये, तोडफोड होऊ नये, याची दक्षता त्यांनी घेतली.

मात्र अशा स्थितीतही काही कार्यकर्ते बसवर चढले व घोषणाबाजी सुरू केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना खाली उतरण्यास भाग पाडले. बससमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना तेथून हटविले. अर्ध्या तासानंतर कदंबा बस मार्गस्थ झाली. मात्र त्यानंतरही कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांचे चन्नम्मा चौकात आंदोलन सुरूच होते.

म्हादई पाणीवाटपाचा विवाद मिटविण्यासाठी स्थापन केलेल्या म्हादई प्रवाह प्राधिकरणाच्या सदस्यांनी रविवारी (ता. ७) खानापूर तालुक्याला भेट दिली. कर्नाटकाकडून सुरू केलेल्या कळसा व भांडुरा प्रकल्पाच्या कामाची त्यांनी पाहणी केली. म्हादई खोऱ्यातील जे पाणी नैसर्गिकरीत्या गोव्याला मिळते, ते कर्नाटकाकडून वळविल्याची गोवा सरकारची तक्रार आहे.

पावसाळ्यात म्हादई खोऱ्यातील पाण्याच्या प्रवाहाची नेमकी दिशा कळते, तेव्हा प्राधिकरणाकडून आताच पाहणी व्हावी, असा गोव्याचा आग्रह होता. त्यानुसार पाहणी केली. मात्र या पाहणी दौऱ्याला कन्नड संघटनांकडून विरोध होता. कर्नाटकाने हा दौरा रद्द व्हावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी त्यांची मागणी होती. मात्र प्रत्यक्षात शासनाने त्यात हस्तक्षेप केला नाही.

कन्नड संघटनेचा थयथयाट

म्हादई प्रवाह प्राधिकरणाच्या सदस्यांनी भेट देऊन कर्नाटक पाटबंधारे विभागाकडून माहिती घेतली. त्यामुळेच कन्नड संघटनांनी थयथयाट सुरू केला. गोवा राज्याचा निषेध करण्यासाठी गोव्याची बस अडवून आंदोलन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT