Siddhanna Meti News | Kannada Mahasangh Dainik Gomantak
गोवा

पंचायत निवडणुकांमधून कन्नड महासंघाची माघार

चर्चेला अखेर पूर्णविराम; आव्हान संपुष्टात आल्याने संघर्ष टळला

दैनिक गोमन्तक

पणजी : पंचायत निवडणुकांमध्ये कन्नड पॅनेल उभे करू, निवडणुका लढवल्या जातील, असे जाहीर आव्हान अखिल गोवा कन्नड महासंघाने केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. याबाबत उलट-सुलट चर्चा होऊन संघर्ष होण्याची शक्यता अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती, परंतु सिद्दण्णा मेटी यांनी अखिल गोवा कन्नड महासंघ पंचायत निवडणुका लढविणार नाही असे जाहिर केले आहे. त्यामुळे चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

राज्यात होऊ घातलेल्या 186 पंचायतींच्या निवडणुकांमध्ये ज्या ठिकाणी कन्नड लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे, अशा सांकवाळ, बागा, कळंगुट, दाबोळी, मुरगाव, डिचोली, फोंडा या परिसरातील पंचायतींमध्ये कन्नड पॅनेल उभे करून निवडणुका लढवण्याचे आव्हान महासंघाने दिले होते. याविरोधात राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करीत संविधानाच्या आधारे निवडणुका लढविण्याचा प्रत्येकाला अधिकार असला तरी भाषिक पातळीवरती राजकीय गट निर्माण करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले होते. याला रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) यांनी आक्षेप नोंदवून कन्नडिगांना निवडणुका लढवण्यावर बंदी घालावी, अशी मागणी केली होती. या सर्व संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महासंघाने निवडणुकांमधून माघार घेतल्याचे आज पत्रक जाहीर केले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी कन्नड भाषिकांनी निवडणुका लढवून त्या जिंकल्याचेही अनेक उदाहरणे आहेत. सांकवाळचे माजी सरपंच शरण मेटी दोनवेळा कन्नड महासंघाच्या झेंड्याखाली निवडून आले होते. याशिवाय अनेक ठिकाणी निवडणुका लढवून त्या जिंकल्यासुद्धा आहेत. यंदा मात्र कन्नड महासंघाने स्वतंत्र पॅनेल उभे करण्याची घोषणा केल्याने संघर्ष निर्माण होण्याची शक्यता होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT