Goa News |Kankumbi Mauli Temple Dainik Gomantak
गोवा

Goa News: कणकुंबीत एका तपाने होणार माऊलींची भेट

चोर्लाघाट माथ्यावरील कणकुंबी, चिगुळे व दोडामार्ग तालुक्यातील कोदाळी या तीन गावांच्या माऊली देवींचा 12 वर्षांनी होणारा ‘भेट’ सोहळा व जत्रोत्सव सहा दिवस साजरा होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: चोर्लाघाट माथ्यावरील कणकुंबी, चिगुळे व दोडामार्ग तालुक्यातील कोदाळी या तीन गावांच्या माऊली देवींचा 12 वर्षांनी होणारा ‘भेट’ सोहळा व जत्रोत्सव शुक्रवार, 10 ते बुधवार, 15 रोजी असे सहा दिवस साजरा होणार आहे. यातील सर्वात महत्त्वाचा श्री माऊली देवींचा भेट उत्सव रविवार, 12 रोजी होणार आहे.

दरम्यान, शनिवार, 11 रोजी कोदाळी येथील माऊली देवीच्या पालखीचे चिगुळे येथे आगमन होणार आहे. चिगुळे माऊली देवी आणि कोदाळ येथील माऊली यांची मिरवणूक झाल्यानंतर रात्री 12 वाजता श्री सातेरी केळबाई नाट्य मंडळ पारवाड यांच्यातर्फे संगीत ‘सावतामाळी’ हे विठ्ठल गावडे पारवाडकर लिखित नाटक सादर होणार आहे.

रविवार, 12 रोजी चिगुळे-कणकुंबी रस्त्यालगतच्या ‘धुळ्याच्या वरंड्याकडे’ या जागी कणकुंबी, चिगुळे व कोदाळी या तीन माऊली भगिनींची भेट सकाळी 9 वाजता होणार आहे. त्यानंतर तिन्ही माऊलींच्या पालख्या कणकुंबी गावी जातील.

तेथे विविध धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर रात्री कणकुंबी युवकांतर्फे श्री माऊली मंदिरासमोर ‘संगीत अमृत मोहिनी’ हे नाटक सादर होईल. या नाटकाचे निर्माते गोविंद गावडे तर दिग्दर्शक प्रभाकर पंडित आहेत.

सोमवार, 13 रोजी दिवसभर धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर रात्री सुर्ला-सत्तरीतर्फे ‘करीन ती पूर्व’ हे नाटक सादर होणार आहे. मंगळवार, 14 रोजी दिवसभर धार्मिक विधी झाल्यानंतर रात्री तळावडे युवकांतर्फे ‘शिवशाहीचा विजयी डंका’ हे नाटक सादर होणार आहे.

म्हातारी बाय मंदिराचे शुक्रवारी उद्‌घाटन

चोर्लाघाटावरील चिगुळे येथील म्हातारी बाय मंदिराचे उद्‌घाटन शुक्रवार, 10 रोजी होणार आहे. म्हातारी बायची मूर्ती प्रतिष्ठापना पारवडेश्वर मठाचे मठाधीश भाऊ महाराज यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त पहाटेपासून विविध धार्मिक विधी होतील.

या सर्व कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी प्रकाश चौगुले असणार आहेत. सायंकाळी पालखी मिरवणूक व रात्री चिगुळे युवकांतर्फे संगीत ‘धनुर्वेद’ हे नाटक सादर होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT