Goa Murder Case |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Ponda Death Case: अपघात नव्‍हे, खूनच! ‘गोमन्‍तक’चा दावा ठरला खरा

Kanhaiya Kumar Mondal Murder: मायणा-कुडतरी पोलिसांकडून अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्‍हा नोंद

गोमन्तक डिजिटल टीम

लोटलीतील कन्हैयाकुमार मोंडल (वय ३२ वर्षे) याचा मृत्यू अपघातीच, असा हेका धरून बसलेल्‍या मायणा-कुडतरी पाेलिसांनी शेवटी आपला पवित्रा बदलत आज या प्रकरणात खुनाचा गुन्‍हा नोंद केला. हा मृत्‍यू अपघाती नव्‍हे, तर तो घातपाताचाच प्रक़ार आहे, असे दैनिक ‘गाेमन्‍तक’ने ठामपणे सांगितले होते. अखेर ‘गाेमन्‍तक’चे वृत्त खरे ठरले.

सध्‍या पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्‍हा नोंद केला असला तरी या प्रकरणात फोंडा पोलिसांनी जी संशयास्‍पद कृती केली, तिचीही कसून चाैकशी करण्‍याची गरज व्‍यक्‍त केली जात आहे.

२५ जून रोजी लोटली येथे वेर्णा औद्योगिक वसाहतीजवळ मायणा-कुडतरी पाेलिसांना हा मृतदेह सापडला हाेता. त्‍याच्‍या अंगावरून वाहन गेल्‍याचे दिसून आल्‍याने पाेलिसांनी सुरवातीला हे प्रकरण ‘हिट ॲण्ड रन’ म्‍हणून नाेंदविले होते.

मात्र, या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली असता, त्‍याच्‍या देहावर तीक्ष्‍ण हत्‍याराने केलेले दहा घाव सापडले. शिवाय त्‍याच्‍या अंगावरून वाहन जाण्‍यापूर्वीच त्‍याचा मृत्‍यू झाला हाेता, हे स्‍पष्‍ट झाले होते. तरीही मायणा-कुडतरी पाेलिस ‘हिट ॲण्ड रन’ थेअरीपासून दूर जाण्‍यास तयार नव्‍हते.

शुक्रवारी मडगावात पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी भेट दिली. त्‍यावेळी पत्रकारांनी त्‍यांना या घटनेबद्दल विचारले असता, वैद्यकीय अहवालानुसारच पुढील कारवाई करू, असे सांगून या प्रकरणात खुनाचा गुन्‍हा नाेंद करू, असे अप्रत्‍यक्ष संकेत त्यांनी दिले होते. त्‍यांनी हे संकेत देऊनही पाेलिसांना खुनाचे कलम जोडण्‍यासाठी आणखी २४ तास लागले.

२५ जून रोजी रात्री हा मृतदेह आढळल्यानंतर मायणा-कुडतरी पोलिसांनी ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरण नोंद केले. मात्र, नंतर मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर त्‍याच्‍या नातेवाईकांना फोंडा पोलिसांनी कन्हैयाकुमारला गोंधळ घातल्याचे कारण देत ताब्यात घेतले होते, अशी माहिती प्राप्‍त झाली. त्‍याला ताब्‍यात घेतल्‍यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडल्याचे सांगितले.

फोंडा पोलिसांच्या ताब्यातील व्यक्ती लोटलीत पोहोचलीच कशी, याचा शोध घेत असताना फोंडा पोलिसांच्या रॉबर्ट व्‍हॅनने त्याला आणून सोडल्याची माहिती मायणा-कुडतरी पोलिसांना मिळाली. पोस्‍टमार्टेम अहवालातही मृताचा गळा, हातासह पोटावर हत्‍याराने वार केल्याचे तसेच वाहन अंगावरून जाण्यापूर्वीच कन्हैयाकुमारचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणातील खुनाचा संशय बळावला होता.

दरम्यान, सेवेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांच्या रॉबर्ट वाहनावरील हवालदार रवींद्र नाईक, कॉन्स्टेबल अश्विन सावंत आणि वाहनचालक प्रीतेश प्रभू यांना निलंबित करण्यात आले. मृतदेहावरून गेलेला ट्रक कर्नाटकातून ताब्यात घेतला असून ट्रकचालकालाही ताब्यात घेतले होते.

पोलिसांनीच केली पोलिसांची दिशाभूल

सुरुवातीला फोंडा पोलिसांनी आपण कन्‍हैयाकुमारला बोरी सर्कलजवळ सोडले होते, अशी जबानी दिली हाेती. मात्र, अपघात झालेल्‍या स्‍थळावरील सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, फाेंडा पोलिसांची रॉबर्ट व्‍हॅन त्‍या रात्री लाेटलीत दिसली हाेती. त्‍यामुळे सुरुवातीला फोंडा पोलिसांनी मायणा-कुडतरी पाेलिसांची दिशाभूल का केली, हाही प्रश्‍न निर्माण होत असून याचीही चाैकशी होण्‍याची गरज व्‍यक्‍त केली जात आहे.

‘ती’ जागा गर्दुल्ले बसण्‍याची

ज्‍या ठिकाणी हा खून झाला, तिथे सर्रास गांजा ओढून तर्रर्र झालेले गर्दुल्ले बसलेले असतात. अशा गर्दुल्ल्‍यांशी वाद झाल्‍यानंतर त्‍यांनी कन्हैयाकुमारवर हत्‍याराने वार तर केले नसावेत ना, अशी शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

SCROLL FOR NEXT