sainath temple curchorem  Dainik Gomantak
गोवा

Curchorem: गुन्हा नोंद न केल्यास उपोषण करू! कामराळ-कुडचडे ग्रामस्थांचा इशारा; साईनाथ देवस्थानातील घोटाळ्यावरुन तापले प्रकरण

Sainath Temple Curchorem: साईनाथ पंचायतन देवस्थानात मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा केलेला असून यासंबंधी कुडचडे पोलिस स्थानकावर तक्रार देऊन यासंदर्भात अजून गुन्हा नोंद केलेला नाही

Sameer Panditrao

मडगाव: कामराळ-कुडचडे येथील साईनाथ पंचायतन देवस्थानात काही जणांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा केलेला असून यासंबंधी कुडचडे पोलिस स्थानकावर तक्रार देऊन कित्येक दिवस उलटले तरी यासंदर्भात अजून गुन्हा नोंद केलेला नाही, असे स्थानिकांतर्फे मंगळवारी (ता.१०) सांगण्यात आले.

आठ दिवसांत संबंधितांवर गुन्हा नोंद केला नाही तर पोलिस स्थानकासमोर उपोषणाला बसू, असा इशाराही स्थानिकांनी दिला.या देवस्थान समितीचे सरचिटणीस सुदेश नाईक यांच्यासमवेत मंगळवारी समिती सदस्य आणि काही स्थानिकांनी मडगाव येथे पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला.

वेगळी संस्था स्थापन करून गैरव्यवहार

या देवस्थानच्या कार्यकारी समितीचे सदस्य विनोद नाईक यांनी याप्रकरणी देवस्थान समितीचे अध्यक्ष विजय पंचवाडकर यांच्याविरोधात तक्रार दिल्याचे सांगितले. या देवस्थानच्या ऐवजी वेगळी संस्था स्थापन करून देवस्थानाला आलेला सगळा पैसा या बँक खात्यात वळवून हा गैरव्यवहार केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT