MLA Kedar Naik On Tinted Glasses Cars Dainik Gomantak
गोवा

Kamakshi Murder Case: राज्याच्या हद्दीवरील दोन्ही चेकपोस्टमध्ये त्रुटी; टिंटेड ग्लास वाहने तापासा : आमदार केदार नाईक

कामाक्षी खून प्रकरणात काळ्या काचा असलेल्या कारचा वापर करण्यात आला होता

Rajat Sawant

MLA Kedar Naik On Tinted Glasses Cars: पर्वरी येथील कामाक्षी खून प्रकरणात संशयिताने मृतदेह आंबोलीत नेण्यासाठी काळ्या काचा (Accused use Tinted Glasses Car) असलेल्या कारचा वापर केला होता. काळ्या काचा असलेल्या कारचा वापर करीत त्याने गोवा हद्द पार करीत महाराष्ट्रात प्रवेश केला होता.

पर्वरी ते गोव्याची हद्द पत्रादेवी येथील महामार्गावर तसेच पत्रादेवी चेक पोस्टवर पोलिसांची गस्त असते. वाहतूक पोलिस तसेच चेक पोस्ट वरील पोलिसांच्या नजरेतून ही कार कशी चुकली असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. तसेच पोलिसांच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान यावर साळगावचे आमदार केदार नाईक यांंनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक चेकपोस्टवर काळ्या काचा असलेली वाहने तापासली पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली. तसेच दोन्ही चेकपोस्टवर त्रुटी असल्याचाही आरोप आमदार केदार यांनी केला.

आमदार केदार नाईक म्हणाले, "व्हीआयपी असोत किंवा इतर सामान्य व्यक्ती. प्रत्येक चेकपोस्टवर काळ्या काचा असलेली वाहने तापासली पाहिजेत. वाहनाला काळ्या काचा लावल्याचे आढळल्यास दंड ठोठावण्यात यावा. गोवा राज्याच्या हद्दीवरील दोन्ही चेकपोस्टमध्ये त्रुटी आहेत" असे नाईक म्हणाले.

रविवारी पोलिसांनी आणि फॉरेन्सिक टीमने पर्वरीतील घटनास्थळी संशयिताला नेत पंचनामा केला. महत्त्वपूर्ण पुरावे गोळा करण्यासाठी तपास पथकांनी गुन्ह्याच्या ठिकाणी बारकाईने शोध घेतला.

कामाक्षी उड्डापनोवा हिच्या शरिरावर तब्बल चाकूचे 20 वार असल्याचे शवविच्छेदनाचा अहवालातून स्पष्ट झाले आहे. या चाकूच्या वारांमुळेच कामाक्षीचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच संशयितांनी तिचा मृतदेह आंबोली घाटात 50 फूट खोल दरीत फेकून दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT