Goa Culture Dainik Gomantak
गोवा

Goa Culture: पिळगाव येथील कळसोत्सव उत्साहात; शुक्रवारी मध्यरात्री सांगता

तीन दिवस साजरा करण्यात आलेल्या कळसोत्सवाची शुक्रवारी मध्यरात्री सांगता झाली.

दैनिक गोमन्तक

Goa Culture: अग्निदिव्य आदी पारंपरिक कार्यक्रम आणि शेकडो भक्तगणांच्या साक्षीत पिळगावची ग्रामदेवता श्री शांतादुर्गा देवीचा वार्षिक कळस उत्सव शुक्रवारी मध्यरात्री मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरा करण्यात आला. तीन दिवस साजरा करण्यात आलेल्या कळसोत्सवाची शुक्रवारी मध्यरात्री सांगता झाली.

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढी पाडव्याच्या दिवशी श्री देवी शांतादुर्गेचा कळस आपल्या भक्तांच्या घरी जात असतो. गावकर मंडळी कळस घेऊन ग्रामस्थांच्या घरात गेल्यानंतर प्रत्येक घरात कळसाचे विधिवत पूजन आदी सेवा करण्यात येते.

सुहासिनी यावेळी देवीची ओटी भरतात. पूर्वीच्या काळी पाडव्या दिवशीच रात्रौ कळस पुन्हा मंदिरात येत असे. परंतु आता लोकवस्ती वाढल्यामुळे कळस पुन्हा मंदिरात पोचायला तीन दिवस लागतात.

शुक्रवारी (ता.24) गिमोणे येथील प्रभु रामचंद्र मंदिर आणि पांडव कालीन चंद्र सूर्य (चांद, सूर्य) प्रतिमा कोरलेल्या पाषाणावर विधिवत पूजन झाल्यानंतर रात्री उशिरा पारंपरिक वाटेने कलशाचे मंदिरात आगमन झाले. त्याठिकाणी मध्यरात्री होमकुंड उत्सव साजरा करण्यात आला. भक्तगणांसह देवीच्या कलशासह अवसारी मोडाने वाजतगाजत अग्निदिव्य केल्यानंतर पारंपरिक पद्धतीने या उत्सवाची सांगता झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT