Karnataka officer visits Kalasa Canal.  Dainik Gomantk
गोवा

Mahadayi Water Disputes: म्हादईवरील प्रकल्प उशाशी, मात्र तरीही कणकुंबीकर उपाशी

सध्या मंजुरी मिळाली असली तरी स्थानिकांना तसेच खानापूर तालुक्याला या पाण्याची तरतूद प्रकल्पात नाही.

दैनिक गोमन्तक

kalasa Project: बहुप्रतीक्षित असणाऱ्या कळसा-भांडुरा प्रकल्पाला केंद्र शासनाचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर त्याच्या उर्वरित कामाला गती येणार आहे. हा प्रकल्प असणाऱ्या कणकुंबी भागाला मात्र पाण्यासाठी वणवण करावी लागणार असून प्रकल्पाचा उद्देश केवळ धारवाडसह इतर जिल्ह्यांच्या विकासासाठी आहे हे लपून राहिलेले नाही.

2006 साली या प्रकल्पास सुरुवात झाली. धारवाड जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजेसाठी 1.72 टीएमसी पाणी उचलण्यासाठी कणकुंबी गावाजवळील कळसा नाल्याचे पाणी मालप्रभा नदीत वाळविण्यासाठी भुयारी कालवे निर्माण केले आहेत.(Mahadayi Water Disputes News Updates)

तर परत 2.18 टीएमसी पाणी उचलण्यासाठी नेरसेजवळील भंडुरा नाल्यावर धरण उभारून ते पाणीही मलप्रभेत आणण्याचे नियोजन आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने 2019 साली वन आणि पर्यावरण विभागाच्या मंजुरीनंतरच त्याची अंमलबजावणी करण्यात यावी या अटीवर कळसा-भांडुरा प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्यांनतर गोवा आणि कर्नाटक दोन्ही राज्यांत हा प्रश्न राजकीयदृष्ट्या वापरला गेला.

नागरिक, शेतकरी नाराज

  • सध्या मंजुरी मिळाली असली तरी स्थानिकांना तसेच खानापूर तालुक्याला या पाण्याची तरतूद प्रकल्पात नाही. त्यामुळे नागरिकांत नाराजी आहे.

  • भुयारी कालव्याच्या प्रकल्पात वापरात आलेल्या शेतजमिनी अद्यापही शेतकऱ्यांकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

  • मलप्रभा नदीचे उगमस्थान असणाऱ्या कणकुंबी गावाजवळ प्रकल्प असताना तीन-चार महिने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ स्थानिकांवर येते. प्रकल्पामुळे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत नष्ट झाले आहेत.

कळसा-भांडुरा प्रकल्पाचा कणकुंबी किंवा खानापूर तालुक्याला काहीही फायदा नाही उलट या प्रकल्पांमुळे कणकुंबीतील नैसर्गिक पाण्याचे स्रोत नष्ट झाले आहेत. त्याचा फटका आम्हाला बसत असून पाणीटंचाई होत आहे, त्यामुळे हा प्रकल्प आमच्यासाठीही संकटच आहे.

कर्नाटकातील आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या प्रकल्पाचे काम मार्गी लावण्याचे कर्नाटकने प्रयत्न चालविले आहेत. याला आमचा विरोध आहे. - दीपक वाडेकर, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष, कणकुंबी

कणकुंबी परिसरात पाणीटंचाई आहे. कळसा-भांडुराच्या खणलेल्या कालव्यामुळे नैसर्गिक जलस्त्रोत नष्ट झाले आहेत, त्यामुळे प्रथम कणकुंबी परिसरातील लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करावी. या भागातील रस्ते करावेत आणि त्यानंतर येथील पाणी मलप्रभेत सोडण्याचा विचार करावा. जोपर्यंत या भागात सोयी होत नाहीत, तोपर्यंत आमचा कळसा-भंडुरा प्रकल्पाला विरोध आहे. - रमेश खोरवी, ग्रामपंचायत अध्यक्ष, कणकुंबी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

SCROLL FOR NEXT