Kadamba bus service Dainik Gomantak
गोवा

Kadamba Velankanni Bus: तामिळनाडूतील वालंकणीसाठी कदंबाच्या विशेष बसगाड्या! कुठून सुटणार गाड्या, काय असणार तारीख जाणून घ्या..

Velankanni Kadamba Bus: तामिळनाडूतील वालंकणी येथील अवर लेडी चर्च येथे जाण्यासाठी दोन विशेष तीर्थयात्रा बसगाड्या चालवण्याच्या कदंब महामंडळाच्या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे.

Sameer Panditrao

मडगाव: तामिळनाडूतील वालंकणी येथील अवर लेडी चर्च येथे जाण्यासाठी दोन विशेष तीर्थयात्रा बसगाड्या चालवण्याच्या कदंब महामंडळाच्या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे. भाविकांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने या उपक्रमात २ अधिक १ आसन क्षमतेसह नवीन वातानुकूलीत स्लीपर बसेस धावतील.

पहिली फेरी २७ ऑगस्ट रोजी गोव्याहून माडी उत्सवापूर्वी निघणार आहे तर दुसरी फेरी ५ सप्टेंबर रोजी वालंकणी येथील वार्षिक उत्सवाच्या अनुषंगाने निघणार आहे. मी अनेक वर्षांपासून वालंकणीला प्रवास करत आहे व राज्याकडून अशा वाहतूक पर्यायाची व्यवस्था होण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे ज्येष्ठ नागरिक अँथनी बार्बोझा म्हणाले. नावेलीचे रहिवासी मिनिनो फर्नांडिस यांनीही समाधान व्यक्त केले.

कदंब अधिकाऱ्यांनी सांगितले, की जागा मर्यादित आहेत व निराशा टाळण्यासाठी इच्छुक यात्रेकरूंनी लवकर बुकिंग करावे. राज्यातील धार्मिक पर्यटनाला पाठिंबा देण्याच्या कदंब महामंडळाच्या प्रयत्नांपैकी हा उपक्रम एक आहे. गोव्यातील चार प्रमुख ठिकाणांहून या विशेष बसेस सुटतील.

म्हापशातून सकाळी ८.३० वा., पणजी सकाळी ९ वा., मडगाव सकाळी १० वा. आणि फोंडा सकाळी १०.३० वा. या बसेस सुटतील.

सहा हजार भाडे!

संपूर्ण फेरीसाठी भाडे ६,००० रु. निश्चित करण्यात आले आहे, ज्यामध्ये जीएसटीचा समावेश आहे. तथापि, भाड्यात जेवण किंवा निवास व्यवस्था समाविष्ट नाही आणि यात्रेकरूंना वालंकणीमध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था स्वतः करण्याची सूचना देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT