Kadamba Corporation Dainik Gomantak
गोवा

Kadamba Transport Corporation: कदंब’चे आता टॅक्सीसेवेतही पाऊल

रोजगाराची संधी : पाच वर्षांसाठी घेणार मासिक भाडेपट्टीवर टॅक्सी

गोमन्तक डिजिटल टीम

Kadamba Transport Corporation राज्यात आधीच टॅक्सी सेवेत गोवा माईल्स, टुरिस्ट टॅक्सी, काळी-पिवळी टॅक्सी, यासारख्या संघटना टॅक्सीसेवा देत आहेत.

सरकारच्या ‘म्हजी बस’ या योजनेअंतर्गत कदंब वाहतूक महामंडळाने राज्यातील काही निवडक मार्गांवर खासगी बस भाड्याने घेण्यासाठी अर्ज मागविल्यानंतर आता पाच वर्षांच्या कालावधीसाठी मासिक आधारावर टॅक्सी भाड्याने घेण्यासाठी टॅक्सी ऑपरेटर्सकडून अर्ज मागवले आहेत.

त्यासंदर्भात कदंब महामंडळाने नोंदणीकृत व अनुभवी टॅक्सी ऑपरेटर्सकडून त्यांचे दरपत्रकही मागवले आहे. कदंब महामंडळाने वातानुकुलित व बिगर वातानुकुलित टॅक्सी ऑपरेटर्सना आवाहन केले आहे.

लक्झरी कार, नॉन एसी वाहनांचा समावेश

टॅक्सीमालकांनी कदंब करार केल्यास किमान पाच वर्षे टॅक्सी भाडेपट्टीवर द्यावी लागेल. त्यानंतर एक एक वर्ष मुदत वाढवण्याची सोय ठेवण्यात आली आहे.

मासिक भाडेपट्टीवर घेण्यात येणाऱ्या टॅक्सीमध्ये एसी सेडान, एसी हॅचबॅक, एसी एमयूव्हीएस, एसी एसयूव्हीएस, लक्झरी कार, नॉन एसी वाहने, जीप इत्यादी वाहनांचा समावेश असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Deepti Naval: ‘कला का सबसे सुंदर रूप छिपाव है'! बहुगुणी, चिंतनशील अभिनेत्री 'दीप्ती नवल'

Tracy De Sa: तरुणाईला थिरकवणारी हिप-हॉप स्टार, मूळ गोमंतकीय असणारी रॅपर 'ट्रेसी डी सा'

Goa Accidents: गोव्यात रस्त्यावर गाडी हाकणे वा चालणे दिव्य ठरत आहे; अपघातांचे प्रमाण आणि रस्ता सुरक्षा सप्ताह

Mapusa Police Quarters: म्हापसा पोलिसांचे ‘क्वाटर्स’ मोडकळीस! ‘साबांखा’चे दुर्लक्ष; कर्मचाऱ्यांची गैरसोय

मुंबईतही सुरु होणार गोव्यासारखी पायलट सेवा! रिक्षा-टॅक्सीला पर्याय, दर खिशाला परवडणारा; माहिती घ्या

SCROLL FOR NEXT