Kadamba Transport Corporation Dainik Gomantak
गोवा

Netravali: कथित शिकार प्रकरणी कदंबच्या 16 कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; महामंडळ दोन दिवसांत घेणार कारवाईचा निर्णय

Kadamba Transport Corporation: महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सध्‍या गोव्याबाहेर आहेत. ते परतल्यावर दोन दिवसांत योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार उल्हास तुयेकर यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Kadamba Transport Corporation issued show cause notice to 16 employees: नेत्रावळी अभयारण्यातील साळजिणी येथे सहलीला गेलेल्या १६ कदंब कर्मचाऱ्यांविरोधात वन खात्याकडून कथित शिकारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर, आता या प्रकरणी कदंब वाहतूक महामंडळाने या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यास अनेकांनी उत्तर दिले आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सध्‍या गोव्याबाहेर आहेत. ते परतल्यावर दोन दिवसांत योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार उल्हास तुयेकर यांनी दिली.

वन खात्याने वनसंरक्षण कायद्याखाली या १६ कदंब कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा केल्यानंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती. तर, महामंडळाने या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई का केली जाऊ नये असे नमूद करून सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले होते. त्यानुसार काही कर्मचाऱ्यांनी या नोटिशीला उत्तर दिले आहे. सध्या हे कर्मचारी मडगाव डेपोमध्ये सेवेत आहेत. वन खात्याने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केल्याने ते चांगलेच अडचणीत आले आहेत.

वनरक्षक, ड्रोनद्वारे अभयारण्‍यात निगराणी

वन खात्याने अभयारण्यातील क्षेत्रात शिकारीसाठी जाणाऱ्यांवर लक्ष ठेवण्‍यासाठी तसेच आगीच्या घटना टाळण्यासाठी काही वनरक्षकांची नियुक्ती केली आहे. शिवाय ड्रोनद्वारेही या क्षेत्रात निगराणी ठेवली जात आहे. सुमारे आठ ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. अभयारण्यात येणाऱ्या लोकांची तसेच पर्यटकांची तपासणी वनरक्षकांकडून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT