Kadamba bus breakdown at mayem Dainik Gomantak
गोवा

‘कदंब’ची बस ब्रेकडाऊन, सतर्क बसचालकामुळे टळला धोका; विद्यार्थ्यांसह, प्रवाशांची गैरसोय

Kadamba Bus Breakdown: डिचोली-पैरा मार्गावर वाहतूक करणारी कदंबची प्रवासी बस आज (मंगळवारी) मये येथे वाटेतच अडकून पडली.

Sameer Panditrao

Kadamba bus breakdown Bicholim Route Mayem students trapped

डिचोली: डिचोली-पैरा मार्गावर वाहतूक करणारी कदंबची प्रवासी बस आज (मंगळवारी) मये येथे वाटेतच अडकून पडली. केळबायवाडा येथील उतरणीवर ‘ब्रेक’मध्ये बिघाड निर्माण झाल्याने बस अडकून पडल्याचे समजते. बसचालकाने धोका ओळखून वेळीच बस थांबवल्याने कोणतीही विपरीत घटना घडली नाही. द’रम्यान, दुपारच्यावेळी बस बंद पडल्याने विद्यार्थी मात्र अडकून पडले.

सायंकाळपर्यंत ही बसगाडी रस्त्यावरच बंदावस्थेत उभी होती. कदंबची जीए-०३-एक्स-०४४० ही प्रवासी बस आज दुपारी डिचोलीहून पैराला जात होती. केळबायवाडा येथील उतरणीवर पोचताच बस नादुरुस्त झाली. या बसमध्ये अन्य प्रवाशांसमवेत विद्यार्थी होते. बस नादुरुस्त झाल्याने त्यांची गैरसोय झाली.

गैरव्यवस्थापन म्हणा किंवा अनागोंदी कारभार म्हणा. कदंब वाहतूक महामंडळाची प्रवासी बससेवा अधूनमधून बेभरवशाची बनत चालली आहे. ग्रामीण भागातील मार्गावर तर हा प्रकार सवयीचाच झाला आहे. ‘कदंब’ची प्रवासी बससेवा प्रवाशांचा कधी घात करेल, त्याचा नेम नाही, असे प्रवाशांना अनुभव येत असतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pirna Murder Case: पीर्ण खून प्रकरणी कोलवाळ पोलिसांना मोठं यश, दोन आरोपींनी केले आत्मसमर्पण; लवकरच होणार मोठा उलगडा?

VIDEO: बाणावली बीचवर 'डॉल्फिन'चं दर्शन! मच्छीमार पेले यांनी शेअर केलेला व्हिडिओ Viral, समुद्रातील अद्भुत दृश्य एकदा पाहाच

Astrology: लग्नात अडचणी येतायेत? 'हे' अशुभ ग्रह ठरतात अडथळा, काय सांगते तुमच्या कुंडलीतील अशुभ ग्रहांची स्थिती? जाणून घ्या

Amol Muzumdar: ‘..हा पुढचा सचिन तेंडुलकर'! पदार्पणात 260 धावांची खेळी, हिटमॅन रोहितला दिली संधी; विश्वचषकामागचा 'नायक'

Goa Politics: 'स्थलांतरित-समर्थक' सरकार दीड वर्षात पडणार, RGP स्थापन करणार पुढचे सरकार! मनोज परब यांचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT