kadamba bus fire.jpgkadamba bus fire.jpg 
गोवा

वाळपईत कदंबा बसला शाँर्टसर्किटने आग

दैनिक गोमन्तक

वाळपई:  वाळपई (walpai) येथे हातवाडा जंक्शनजवळ आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास चालत्या कदंबा (Kadamba Bus) बसला शाँर्ट सर्किटमुळे (Short Circuit) आग लागून नुकसानी झाली आहे. मिळालेल्या माहीतीनूसार झर्मे ते वाळपई पणजी अशी प्रवास करणारी ही कदंबा बस होती. कदंबा बस क्रमांक जी. ए. 03 एक्स 0246 ही गाडी रोजच्या वेळेनूसार वाळपई येथून पणजीत जाण्यासाठी निघाली होती. (Kadamba bus in Walpai caught fire due to short circuit)

वाळपई मुख्य बाजारातून निघाल्यावर सुमारे एक दीड किलोमीटर अंतरावर वाळपई सरकारी आरोग्य केंद्र ते हातवाडा जंक्शन या भागात पोहचताच वाहनाच्या समोरील भागातून अचानक धूर येऊ लागला. धूर येत असल्याचे पाहून कदंबा चालकाने तत्काळ वाहन थांबविले. काहीवेळातच गाडीच्या केबीनच्या दर्शनी भागातून आगीने पेट घेतला. यावेळी प्रवाशांना तातडीने खाली उतरविण्यात आले. (goa) 

आग लागल्याची माहीती वाळपई अग्निशमनला दिल्यावर दलाचे जवान तातडीने घटनास्थळी फायर वाहनासहीत दाखल झाले. ए.टी. गावस, गौरेश गावस, साईनाथ सावंत, चालक अमोल नाईक आदींनी मदत कार्य केले. व पाण्याच्या फवाराने आग आटोक्यात आणली. चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या आगीच्या घटनेत कदंबाचे केबीनच्या भागाचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravindra Jadeja ODI Career: रवींद्र जडेजाची वनडे कारकीर्द संपुष्टात? न्यूझीलंड मालिकेपूर्वी चेतेश्वर पुजाराच्या वक्तव्यानं क्रिकेट वर्तुळात खळबळ

Diwali Magazine Tradition: गोव्याच्या साहित्यविश्वाचा दिवाळी फराळ! जाणून घ्या दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा

Parliament Fight Video: संसद बनली कुस्तीचा आखाडा! सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान हाणामारी; लाथा-बुक्क्या अन् पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला

Police Assault: कपडे फाडले, लाथाबुक्क्यांनी तुडवले, टोळक्याने केला हल्ला; ऑन-ड्यूटी पोलिसाला किन्नरांकडून बेदम मारहाण

IND vs NZ 5th T20: पाचव्या टी-20 साठी कर्णधाराची नवी चाल; 5 स्टार खेळाडू संघातून बाहेर, 'अशी' असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

SCROLL FOR NEXT