Kadamba bus service Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus Services : मोदींच्या रॅलीला नाही, तर 'या' कारणासााठी कर्नाटकात बसेस गेल्‍या

रॅलीला नाही, पण कर्नाटकात बसेस गेल्‍या; उत्तर कर्नाटकातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीसाठी कदंब बसेस तैनातीबद्दल माहिती हक्क कायद्याअंतर्गत प्रश्‍‍न विचारले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Kadamba Bus Services : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्‍या सभेवेळी गोव्‍यातून ७० कदंब बसेस कर्नाटकात पाठवण्‍यात आल्‍याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्‍या अनुषंगाने माहिती अधिकाराखाली कदंबने उत्तरादाखल ‘मोदींच्‍या रॅलीसाठी बसेस पाठवल्‍या नाहीत’, असे स्‍पष्‍टीकरण दिले आहे. तथापि, मे महिन्‍यात एका अनौपचारिक कराराद्वारे कदंबने कर्नाटकात पाठवलेल्‍या बसेससाठी 25 लाख 50 हजारांचे भाडे मिळाल्‍याचे कबूल केले आहे.

कर्नाटकात मोदींच्या सभेला गोव्‍यातून बसेस जात असल्‍याचा व्‍हिडिओ समाजमाध्‍यमांतून प्रसारित झाला होता. नियमित मार्गांवर अडचण करून बसेच अन्‍यत्र पाठविण्‍यात आल्‍या आणि त्‍यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागल्‍याचा आरोप करण्‍यात आला होता. ‘गोवा फर्स्ट’ या बिगरसरकारी संघटनेचे अध्यक्ष परशुराम सोनुर्लेकर यांनी 4 मे रोजी उत्तर कर्नाटकातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीसाठी कदंब बसेस तैनातीबद्दल माहिती हक्क कायद्याअंतर्गत प्रश्‍‍न विचारले होते.

औपचारिक कराराचा अन्‍वयार्थ

औपचारिक कराराद्वारे कदंबने कधी आणि किती बसेस कर्नाटकात गेल्‍या ही माहिती टाळली आहे. प्रासंगिक कराराच्‍या अनुषंगाने खासगी व्‍यक्‍तीकडून मोदींच्‍या सभेलाच या बसेस गेल्‍या असाव्‍यात, ही शक्‍यता नाकारता येत नाही. कारण कोणतेही असो; नियमित बसेस अन्‍यत्र वळवल्‍याने प्रवाशांचे हाल झाले होते, हे नाकारता येणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT