Kadamba Bus Driver License Suspended Dainik Gomantak
गोवा

Kadamba Bus: दारू पिऊन बस चालवणारा 'तो' कदंब बसचालक निलंबित; परवानाही रद्द

ओल्ड गोवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद

Kavya Powar

दारू पिऊन वाहन चालवण्याचा प्रकार कदंब चालकाबाबत घडला होता. याप्रकरणी चालकावर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. तर सदर चालकाला निलंबित करण्यात आले असून त्याचा परवानाही रद्द केल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

जुने गोवा पोलिसांनी काल (गुरुवारी) कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या बस चालकावर दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुने गोवा येथील आरोपी एल्विस रॉड्रिग्स (49) याने कामाच्या वेळी वाहन चालवताना मद्यप्राशन केले होते. यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात आणला असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात येत आहे.

काल संध्याकाळी 7.30 च्या सुमारास ही घटना घडली. जेव्हा प्रवाशांनी आरोप केला की चालक दारूच्या नशेत वाहन चालवत होता तेव्हा बस थांबवण्यात आली.

त्यानंतर याप्रकरणी ओल्ड गोवा पोलिस ठाण्यात आयपीसी कलम 279 आणि मोटार वाहन कायद्याच्या 185 अन्वये चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आज (शुक्रवार) मुख्यमंत्र्यांनी त्याला निलंबित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

SCROLL FOR NEXT