Juvem Bridge Goa  Dainik Gomantak
गोवा

Juvem Bridge Closed: "सरकार जुवेच्या लोकांना दुर्लक्षित करू शकत नाही", कांदोळकरांचा सरकारला इशारा

Juvem Bridge News: जुवे-नादोडा येथील पूल धोकादायक स्थितीत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तो सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केला आहे

Akshata Chhatre

जुवे: जुवे-नादोडा येथील पूल धोकादायक स्थितीत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तो सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केला आहे आणि हा पूल बंद असल्याने जुवे बेटावरचे जवळपास २५० रहिवासी अडकून पडले आहेत. स्थानिकांच्या वाहनांसाठी इतर कोणताही पर्यायी मार्ग नसल्याने लोकांना जीवनावश्यक सेवांसाठी लांब अंतरावर चालत जावे लागत आहे, ज्यामुळे त्यांना प्रचंड त्रास होतोय.

हळदोणचे माजी आमदार किरण कांदोळकर आणि जिल्हा पंचायत सदस्य कविता कांदोळकर यांनी शनिवारी (दि. १५ फेब्रुवारी) रोजी या वाहतुकीसाठी बंद ठेवलेल्या पुलाला भेट दिली आणि स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर या त्रस्त रहिवाशांना तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे. कांदोळकर यांनी सांगितले की, नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव २०१५ मध्ये मंजूर झाला होता, मात्र यानंतर सत्ता बदलल्यामुळे तो प्रलंबित राहिला.

त्यांनी आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना हस्तक्षेप करून नवीन पूल बांधण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याची विनंती केली."सरकार जुवेच्या लोकांना दुर्लक्षित करू शकत नाही. हा पूल त्यांचा जीवनमार्ग आहे, हा पूल त्यांना इतर भागांशी जोडतो आणि त्यांची कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी तातडीने पावलं उचलणं आवश्यक आहे," असे कांदोळकर म्हणालेत, तसेच सरकारने वेळीच आवश्यक बदल न केल्यास त्यांनी आंदोलन करण्याचा इशाराही दिलाय.

जुवे येथील पूल बंद असल्याने शाळा, कामाची ठिकाणे आणि आरोग्यसेवा यांसारख्या दैनंदिन जीवनातील महत्वाच्या ठिकाणी पोहोचण्यात स्थानिकांना व्यत्यय आला आहे. जोपर्यंत कायमस्वरूपी पूल बांधला जात नाही, तोपर्यंत किमान तात्पुरती उपाययोजना करण्याची मागणी गावकरी करत आहेत.

याशिवाय कांदोळकर यांनी खासगी विद्यापीठासाठी कोमुनिदाद जमिनीच्या वाटपावरही चिंता व्यक्त केली आहे आणि सरकारने यावर लक्ष दिले नाही, तर ते उच्च न्यायालयात जातील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT