JP Nadda took the blessings of Brahmeshanand Dainik Gomantak
गोवा

Goa: जे पी नड्डा यांनी घेतले ब्रह्मेशानंद यांचे आशीर्वाद

तपोभूमीचे (Tapobhoomi) पीठधीश तथा शांतीदूत सदगुरु श्री ब्रह्मेशानंद महाराज यांचे धार्मिक आणि सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी - तपोभूमीचे (Tapobhoomi) पीठधीश तथा शांतीदूत सदगुरु श्री ब्रह्मेशानंद महाराज यांचे धार्मिक आणि सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. गोव्याच्या (Goa) सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अतुलनीय आहे, असे प्रतिपादन भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J. P. Nadda) यांनी केले. (JP Nadda took the blessings of Brahmeshanand)

श्री क्षेत्र तपोभूमी कुंडई येथे सदगुरु श्री ब्रहमानंद महाराज यांच्या समाधीचे दर्शन आणि सदगुरु श्री ब्रह्मेशानंद महाराज यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट - तानावडे, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, पक्षाचे गोवा प्रभारी सी टी रवी, सौ. सुलक्षणा सावंत आणि पक्षाचे पदाधिकारी, नेते तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री. नड्डा म्हणाले, तपोभूमीचे संस्थापक सदगुरु श्री ब्रह्मानंद स्वामींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळणे हे माझे भाग्य समजतो. गोव्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तपोभूमीचे कार्य मोलाचे आहे. धार्मिक शिक्षणासह अन्य शिक्षणातही तपोभूमीचे काम उल्लेखनीय आहे. सद्गुरू श्री ब्रह्ममेशानंद महाराजांचे आशीर्वाद नेहमी भाजपला मिळत आल्याची माहिती मला मिळाली. ही अत्यंत आनंदाची बाब असून स्वामींचे आमच्या पक्षावरील हे आशीर्वाद कायम राहावेत, असे आवाहन श्री. नड्डा यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी स्वागत केले. तसेच तपोभूमीचे गोव्यातील अनमोल कार्याची माहिती दिली. सदगुरु स्वामींचा भाजपला आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना नेहमीच आशीर्वाद लाभत असल्याचे सांगितले. यापुढेही ते लाभतील, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT