Goa BJP Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: पत्रकारांनीही भाजपमध्ये प्रवेश करावा; उत्तर गोवा खासदाराचे अजब वक्तव्य

North Goa MP Shripad Naik: भारतीय जनता पक्षाच्या वतीने सदस्य नोंदणी कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, गोव्यात देखील याचा मुख्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

Pramod Yadav

Goa BJP

पणजी: उत्तर गोव्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक त्यांच्या अजब वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. भाजपतर्फे आयोजित सदस्य नोंदणी कार्यक्रमात नाईक यांनी पत्रकारांनीही भाजपमध्ये प्रवेश करावा, असे वक्तव्य केले.

पणजी पक्षकार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे देखील उपस्थित होते.

भाजपचे गोव्यात पाच लाख सदस्य नोंदणीचे लक्ष आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. गेल्यावर्षी चार लाख सदस्य नोंदणी झाली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद येस्सो नाईक यांच्यासह मुख्यमंत्री सावंत यांनी प्रथम सदस्यत्व नोंदणी केली.

राज्यात असणाऱ्या साडे बारा लाख मतदारांपैकी पक्ष पाच लाख सदस्यांची भाजपसाठी नोंदणी व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे, असे सावंत म्हणाले. गेल्या वेळच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमात बारा लाख मतदारांपैकी चार लाख सदस्य नोंदणी झाली होती, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

पक्षाच्या सदस्यांना पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांच्या एवढेच किंवा समान अधिकार असल्याचे, सांवत म्हणाले.

यावेळी उपस्थित उत्तर गोव्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी देखील मत व्यक्त केले. पत्रकरांनी देखील देखील भाजपचे सदस्यत्व घेऊन पक्षात प्रवेश करावा. रिपोर्टींग हा व्यावसाय आहे, त्यामुळे ते पक्षात प्रवेश करु शकतात, असे नाईक म्हणाले.

सदस्य नोंदणीचा पहिला टप्पा २५ सप्टेंबरला समाप्त होईल आणि संपूर्ण नोंदणी कार्यक्रम येत्या ऑक्टोबरला संपेल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

सदस्यत्व मोहिमेनंतर विविध बूथ, तालुकास्तरीय युनिट, जिल्हा युनिट आणि राज्याच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. दहापेक्षा जास्त सदस्यांची नोंदणी करणारे पक्षाचे सक्रिय सदस्य होऊ शकतात, असे तानावडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT