Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: नोकऱ्यांचे आमिष दाखवून महिलांवर अत्याचार! आरोपीचे ‘हवाला कनेक्शन’ उघड; बडे मासे सापडण्याची शक्यता

Goa Crime News: लैंगिक अत्याचार प्रकरणी सध्या फातोर्डा पोलिस कोठडीत असलेल्या राज प्रशांत ठाकूर याचे हवालातील कनेक्शन उघड झाले आहे. त्याच्या एकूण नेटवर्कची माहिती पोलिस गोळा करीत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: लैंगिक अत्याचार प्रकरणी सध्या फातोर्डा पोलिस कोठडीत असलेल्या राज प्रशांत ठाकूर याचे हवालातील कनेक्शन उघड झाले आहे. या संशयिताचा हवालात सहभाग असल्‍याची बातमी सर्वप्रथम ‘गोमन्‍तक’ने प्रसिद्ध केली होती.

यावर आता शिक्‍कामोर्तब झाले आहे. राजच्या पोलिस कोठडीत सहा दिवसांची वाढ करण्यात आली असून त्याच्या एकूण नेटवर्कची माहिती पोलिस गोळा करीत आहेत.

गलेलठ्ठ नोकऱ्यांचे आमीष दाखवून महिलांना आपल्या जाळ्यात अडकवणाऱ्या राजने अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा पोलिस प्रयत्न करीत असून त्यातून अनेक बडे मासे जाळ्यात सापडण्याची शक्यता व्‍यक्‍त केली जात आहे.

ब्लॅकमेल करून उकळले ४० लाख

लैंगिक अत्‍याचार केल्यानंतर पिडितांचा व्‍हिडिओ काढून नंतर तो व्‍हायरल करण्‍याची धमकी राज देत होता. त्याने एका पीडितेकडून ४० लाख रुपये उकळले होते. याप्रकरणी पोलिसांनी राजसह अँथनी डिसोझा, सिद्धार्थ कांबळी व ज्योती नागवेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अन्य संशयितांचा शोध चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT