Anjuna Crime News  Dainik Gomantak
गोवा

हणजूण भागातील गुन्हे रोखण्यास सहकार्य हवे

म्हापशाचे नवनियुक्त पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांचे रहिवाशांना आवाहन

दैनिक गोमन्तक

शिवोली : समाजात चांगल्या तसेच वाईट अशा दोन्हीं प्रवृत्ती कार्यरत असतात. परंतु आपल्याला सतर्क राहून वाईटाचा सामना करायचा आहे, त्यासाठी पोलिस प्रशासन बांधील आहेच परंतु सतर्क जनतेनेही याकामात पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन म्हापशाचे नवनियुक्त पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी हणजूण येथे केले. (Anjuna Crime News)

पोलिस आणि जनता यांच्यात सुसंवाद घडवून आणण्यासाठी हणजुण पोलिस स्थानकात ‘समाधान’ कार्यक्रम शनिवारी पार पडला. यावेळी हणजुणचे पोलिस निरीक्षक प्रशल देसाई व्यासपीठावर उपस्थित होते.

शिवोली पंचक्रोशीतील एकूण सहाही पंचायत क्षेत्रातील रहिवाशांनी बैठकीत उपस्थित राहून जीवबा दळवी यांच्याशी पंचक्रोशीला भेडसावणाऱ्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली.

किनारी भागात ड्रग्ज व्यवहार होत असल्याबद्दल ग्रामस्थांनी विचारणा केली. त्यावर दळवी यांनी गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे,असे आवाहन केले.

भाडेकरूंच्या पोलिस पडताळणीसाठी घरमालकांनी पोलिसांना मदत करावी,असे आवाहन दळवी यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

River Pollution: गोव्यात 6 नद्यांचे प्रदूषण कायम; मांडवी-झुआरीसह शापोरा, तेरेखोल आणि साळ नदीत फिकल कोलिफॉर्मचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक

SCROLL FOR NEXT