Goa GMC Dainik Gomantak
गोवा

Goa GMC: झारखंडच्या ‘ब्रेन डेड’चे अवयवदान; दोघांना जीवदान

दैनिक गोमन्तक

Goa GMC: ‘ब्रेन डेड’ झालेल्या झारखंड येथील 40 वर्षीय व्यक्तीच्या नातेवाईकांनी अवयदानाला परवानगी दिल्याने दोन जणांचा मुत्रपिंड प्रत्यारोपण करणे शक्‍य झाले आहे. उंचावरून पडल्याने ती व्यक्ती जबर जखमी झाली होती. तीला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले होते.

डॉ. सनथ भाटकर आणि डॉ. प्रथमेश यांनी त्या रुग्णाला ब्रेन डेड घोषित केले. यामुळे त्याचे अवयव इतरांना दान करणे शक्य झाले. ‘गोमेकॉ’त आजवर पाच वेळा अवयव प्रत्यारोपण करण्यात आले आहे. 19 जणांना त्याचा लाभ झाला आहे. 3 हृदये, 4 यकृते, 2 फुफ्फुसे आदींही ‘गोमेकॉ’तून पुरवण्यात आली आहेत. सध्या 51 जण मुत्रपिंड मिळवण्यासाठीच्या प्रतीक्षा यादीवर आहेत.

गोमेकॉतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी अवस्थेत झारखंड येथील इसमाला इस्पितळात आणण्यात आले होते. त्यामुळे केवळ मुत्रपिंडांचे प्रत्यारोपण करणे शक्य होते. नातेवाईकांच्या परवानगीनंतर मुत्रपिंडांच्या प्रत्यारोपणासाठी दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्या व्यक्तींमुळे दोन जणांना यापुढे डायलिसीसवर जगावे लागणार नाही.

मुत्रपिंडांचे प्रत्यारोपण दोन रुग्णांत करण्यात आले. त्यसाठी प्रतीक्षा यादीतून मुत्रपिंड स्वीकारू शकेल, अशा इच्छुकांची निवड करण्यात आली. त्यासाठी काही वैद्यकीय निकषांचा विचार करण्यात आला.

‘गोमेकॉ’तील समर्पित डॉक्टरांच्या उल्लेखनीय टीमवर्कला धन्यवाद, अवयव दानासाठी पुढे येणाऱ्या नातेवाईकांनी हृदयस्पर्शी असा निर्णय घेतला आहे. ही परोपकारी कृती निर्विवादपणे मानवतेला देऊ शकणारी सर्वात महत्त्वपूर्ण भेट आहे, जी सामूहिक करुणा आणि उदारतेची शक्ती दर्शवते.
विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT