jharkhand worker died in train accident
jharkhand worker died in train accident Dainik Gomantak
गोवा

रोजगारासाठी गोव्यात येण्यापूर्वीच घात झाला, ट्रेनमध्ये चढताना मजुराचा पाय घसरला अन्...

Pramod Yadav

देशातील अनेक राज्यातून रोजगारासाठी लोक गोव्यात येत असतात. पण, प्रवासादरम्यान, काहीतरी घटना घडल्याने काही जणांनी जीव गमावल्याच्या घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. अशीच एक घटना गुमला, झारखंड येथून समोर आली आहे. गुमला येथील एक व्यक्ती रोजगारासाठी गोव्यात येत असताना अर्ध्या रस्तात त्याच्यावर काळाने घाला केला.

(jharkhand worker died in train accident while coming to Goa in search of work)

मिळालेल्या माहितीनुसार, गुमला जिल्ह्यातील बिरकेरा गावातील 35 वर्षीय राजेश गोव्याला नोकरी करण्यासाठी येत होता. दरम्यान, अर्ध्या रस्त्यात रायचुरा जंक्शनवर ट्रेनमध्ये चढत असताना तोल गेल्याने तो पाय घसरून पडला.

दरम्यान, भरधाव येणाऱ्या रेल्वेने त्याला जोराची धडक दिली, त्यात तो गंभीर जखमी झाला. दोन सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ दवाखान्यात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घराची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती. दरम्यान, त्याच्या मृत्यूमुळे मजुराच्या घरावर शोककळा पसरली आहे.

तीन लहान मुलांचे शिक्षण आणि घरातील सर्व गरजेचा खर्च तो भागवत असे.

मजुराच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर मजूर युनियन सीएफटीयूआय झारखंडचे राज्य सचिव जुमन खान यांनी स्थलांतरित कामगार विभाग नियंत्रण कक्ष, गुमला जिल्हा आणि झारखंड राज्य नियंत्रण कक्ष यांना ही माहिती देत मजुराचा मृतदेह परत आणण्याची मागणी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT