Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: झारखंड-गोवा ड्रग्‍स कनेक्‍शन; 4.90 लाखांच्या गांजासह 21 वर्षीय तरुण अटकेत

Drug Trafficking Case: गोवा आणि झारखंड येथील आंतरराज्य ड्रग्स माफियांचा पर्दाफाश केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: ड्रग्स तस्करी आणि ड्रग्स विक्रेत्यांविरोधात गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) रात्रीच्या वेळी गस्त वाढवून गेल्या दहा दिवसांत लागोपाठ तीन ठिकाणी छापे टाकत कडक कारवाई केली आहे.

गोवा आणि झारखंड येथील आंतरराज्य ड्रग्स माफियांचा पर्दाफाश केला आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून थिवी रेल्वे स्थानकाबाहेर सापळा रचून २१ वर्षीय झारखंडच्या हिमांशू लालमणी सिंग याला अटक केली. त्याच्याकडून ४.९० लाखांचा गांजा जप्त केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक नेर्लोन अल्बुकर्क यांनी दिली.

मानवी बुद्धिमत्ता आणि तांत्रिक देखरेखीच्या आधारे एएनसीने मंगळवारी (१ एप्रिल) संध्याकाळी थिवी रेल्वे स्थानकाबाहेर सापळा रचून ही कारवाई केली.

झारखंड आणि गोवा यादरम्यान अशाच प्रकारे आणखी एका आंतरराज्यीय गांजा तस्करी रॅकेट होते, ज्यामध्ये एका गोव्यातील पुरवठादार आणि झारखंडच्या दोघा वाहतूकदारांना १३ किलो गांजासह अटक केली होती.

एएनसीने झारखंडमधील पोलिसांच्या मदतीने झारखंडहून गोव्यात गांजा आणणाऱ्या मुख्य पुरवठादारालाही अटक केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, एएनसी तसेच जिल्हा पोलिस व क्राईम ब्रँचने ड्रग्ससंदर्भातील सुमारे ४५ प्रकरणे नोंद केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT